करमाळा

करमाळा तालुक्यात विविध गावांमध्ये पंतप्रधानांचा ८४ वा मन की बात कार्यक्रम संपन्न

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा तालुक्यात विविध गावांमध्ये पंतप्रधानांचा ८४ वा मन की बात कार्यक्रम संपन्न

केतूर ( अभय माने ) करमाळा तालुक्यातील विविध गावांमध्ये पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी जी यांच्या संकल्पनेतील ८४ व्या मन की बात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यामध्ये तालुक्यातील शेतकरी, ग्रामस्थ, लहान व्यावसायिक व बंधू-भगिनी यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला असल्याची माहिती भाजपा चे तालुका सरचिटणीस अमरजित साळुंके यांनी दिली.

पांडे येथे आयोजीत मन की बात या कार्यक्रमा प्रसंगी ता.सरचिटणीस अमरजित साळुंके, नरेंद्रसिंह ठाकूर उपस्थित होते.

यावेळी पंतप्रधानांनी विविध विषयांवर भाष्य करताना सांगितले की, भारत देशाने तामिळनाडू येथील हेलिकॉप्टर अपघातात अत्यंत शूरवीर असे अधीकारी गमावले आहेत. देशाचे पहिले CDS बिपिन रावत व त्यांचे सहकारी यांचे दुःखद निधन ही अत्यंत दुःखद घटना आहे.

वरूणसिंह यांनी त्यांच्या प्राचार्यांना लिहिलेले पत्र पंतप्रधानांनी वाचून दाखविले. इ.९वी ते १२वी पर्यंत च्या विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेत सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले.देशात आजपर्यंत १४० कोटी कोरोना लसीचे डोस पूर्ण झाले आहेत.

वंदे मातरम मुळे प्रत्येकाच्यात गर्व निर्माण होतो. नुकतेच ग्रीस देशातील विध्यार्थ्यांनी वंदे मातरम गायले आहे. तेलंगाणा राज्यात ८४वर्षे वयाचे डॉ कुरेला विठ्ठलाचार्य यांनी स्वतःच्या पुस्तकांचे वाचनालय सुरू केले आहे त्याचा सर्वजण लाभ घेतात,पुस्तके वाचणे ही चांगली सवय आहे.

कोरोना च्या नवीन व्हेरियंट पासून सर्वांनी सुरक्षित राहावे. ‘महाभारत’ या विषयावर एका संस्थेने ऑनलाईन कोर्स देखील सुरू केला आहे. अरुणाचल प्रदेशात पक्षी संवर्धनासाठी एअरगन सरेंडर अभियान सुरू झाले आहे.काव चा वापर करून चित्रकाराने अनेक चित्र रंगविली आहेत.स्वच्छतेवर आपल्याला लक्ष द्यावे लागेल, SAAF WATER या संस्थेला ग्लोबल अवॉर्ड मिळाला आहे.

समर्पण केले तरच यश मिळते असेही पंतप्रधानांनी सांगितले.ऑनलाइन कॉम्प्युटर प्रणाली मुळे सरकारी कार्यालयातील फायलींचा ढिगारा कमी झाला आहे,त्यामुळे कामांमध्ये तत्परता आली आहे. मोठे विचार मोठी स्वप्ने ठेवली तर प्रगतीचे रस्ते खुले होतात.

आपल्या सर्वांची वाटचाल ही “आत्मनिर्भर भारत” च्या दिशेने चालली आहे, समारोपात असेही पंतप्रधानांनी सांगितले.

यावेळी संजय तेली, अमर वीर युवराज भोसले, सचिन दूधे,विलास काळे, संजय लांडगे, संतोष दूधे,राहुल वीर, प्रकाश जगताप, इजाज मुजावर, सचिन भोसले,दादा दूधे पांडे व परिसरातील युवक,शेतकरी व वयस्क ग्रामस्थ उपस्थित होते.

litsbros

Comment here