करमाळासोलापूर जिल्हा

पारेवाडी भुयारी मार्ग पाण्याखाली, पर्यायी रस्ता ही चिखलात; चिमुकल्या विद्यार्थ्यांचे व नागरिकांचे प्रचंड हाल; खासदार, आमदार, पुढारी व प्रशासन विचार करेल का.?

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

पारेवाडी भुयारी मार्ग पाण्याखाली, पर्यायी रस्ता ही चिखलात; चिमुकल्या विद्यार्थ्यांचे व नागरिकांचे प्रचंड हाल; खासदार, आमदार, पुढारी व प्रशासन विचार करेल का.?

केतूर ( अभय माने) वाशिंबे (ता.करमाळा) येथील वाशिंबे गावाला जोडणारा रेल्वे हद्दीतील किलोमीटर क्रमांक ३२२-३ते ३२२-९ या दरम्यानच्या एक किलोमीटर रस्त्याची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे नागरीकांना व शालेय विद्यार्थ्यांना प्रवास करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

हा परिसर उजनी जलाशयालगत असल्याने पाणथळ जमिनी व दलदलीचे प्रमाण अधिक असल्याने रस्ते खचण्याचे प्रमाण तुलनेने अधिक आहे.मागील आठ दिवसापासून सतत पडणाऱ्या पावसामुळे विद्याथ्र्यांना चिखलातून मार्ग काढत प्रवास करावा लागत आहे.

रेल्वे लोहमार्ग वाशिंबे शिवाराच्या मध्य भागातुन गेला आहे.परिणामी गावाचे दोन भाग झाले आहेत.गावात जाण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे,रस्ता मजबुतीकरन करुन ओढ्याच्या ठिकाणी पुल बांधून संपूर्ण रस्ता सिमेंट काँक्रीट करावा.

अशी मागणी रेल्वे बोर्ड विभागीय अध्यक्ष खासदार रणजीतसिंह नाईक-निंबाळकर यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे असे वाशिंबे ग्रामपंचायत सदस्य गणेश झोळ यांनी सांगितले.

तसेच पारेवाडी येथील भुयारी मार्ग पूर्ण पाण्याखाली गेला असून पर्यायी मार्गावर चिखलाचे साम्राज्य झाले असून यातून वाट काढताना वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे.याकडे रेल्वे प्रशासन तसेच ठेकेदाराचे पूर्ण दुर्लक्ष आहे.


छायाचित्र
(वाशिंबे ता. करमाळा) येथील रेल्वे हद्दीतील रस्त्याची दूरावस्था झाली असून शालेय विद्यार्थ्यांना चिखलातून मार्ग काढत प्रवास करावालागत आहे.

litsbros

Comment here