आरोग्यकरमाळामाणुसकी

करमाळा तालुक्यातील ‘या’ गावच्या ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव; गावातील नारीशक्तीचा एल्गार

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा तालुक्यातील ‘या’ गावच्या ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव; गावातील नारीशक्तीचा एल्गार

  करमाळा (प्रतिनिधी):  पांगरे येथे दि.16.11.2021 रोजी ग्रामसभा सरपंच, प्रा.डाॅ.सौ. विजया दत्तात्रय सोनवणे यांचे अध्यक्षते खाली घेण्यात आली. सदरचे ग्रामसभेत विविध विभागाचे अधिकारी यांनी माहिती दिली.

यामध्ये तलाठी गौरव कुलकर्णी यांनी पीकपाणी नोंदणी इ. बाबत माहीती सांगितली त्याच बरोबर कृषी विभागातर्फे कृषी सहायक सौ. निकत-सरडे मॅडम यांनी विविध योजनांची माहीती सांगितली तसेच शैक्षणिक विभागामार्फत जि.प. शाळेचे मुख्याध्यापक श्री.जाधव सर यांनी शैक्षणिक विकास व प्रगती बाबत माहीती सांगितली.

सदरचे ग्रामसभेत अस्तित्वात aसलेल्या मतदार यादीचे वाचन b.l.o.श्री कांबळे भाऊसाहेब व श्री शिंदे गुरूजी यांनी केले. त्यामध्ये मृताचे व स्थलांतरितांची नावे कमी करण्याचे व चुकीची नावे दुरूस्त करण्याची शिफारस करण्यात आली. या ग्रामसभेसाठी निरीक्षक म्हणून कृषी विभागाचे अधिकारी श्री हनुमंत नलवडे यांची शासनाकडून नियुक्ती होऊन त्यांनी निरीक्षक म्हणून काम पाहिले.

सदरचे ग्रामसभेमध्ये महिला सभेने केलेल्या शिफारशीनुसार गावातील होत असलेल्या दारूविक्रीचे दुष्परिणाम व व्यसनाधीनता व त्याचे परिणामांवर सविस्तर चर्चा होऊन गावामध्ये होत असलेली दारूविक्री पुर्णत: बंद होण्याबाबत ठराव सहमत करण्यात आला. त्याच बरोबर इतर ही ठराव सहमत करण्यात आले.

सदरचे ग्रामसभेत सचिव म्हणून ग्रामसेवक श्री समाधान कांबळे यांनी काम पाहिले. ग्रामसभेस उपसरपंच श्री गणेश वडणे, सदस्य सचिन पिसाळ, महेश टेकाळे, मयुरा पिसाळ मनिषा गायकवाड, राणी पाटिल, संध्या मुरूमकर यांचेसह जि.प. शिक्षक आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका मदतनीस बरोबरच गावातील बहुसंख्य महिलांसह नागरिक उपस्थित होते.

litsbros

Comment here