शॉर्ट सर्किट मुळे दुकानाला आग लागून १५ लाखांचे नुकसान, नुकसानीची भरपाई मिळावी म्हणून करमाळा तहसीलदारांना निवेदन
करमाळा(प्रतिनिधी) ; पांगरे-वांगी फाटा येथील श्री राज कलेक्शन कापड दुकान शाँर्ट सर्किट विज वितरण मुळे जळाले त्याची भरपाई मिळावी म्हणून करमाळा तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी रासपचे करमाळा तालुका अध्यक्ष राज शेटे-देशमुख, जिल्हा सरचिटणीस अंगद देवकते, औदुंबर पेटकर, भाजपचे नरेंद्र ठाकूर, सुदर्शन माने, अमोल दुरंदे, सुनील भोसले, अनिल तेली आदीजन उपस्थित होते.
या दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मौजे पांगरे येथील गट न २८०/१खातेदार गजानन कुलकर्णी यांच्या मालकीचे करमाळा टेंभुर्नी रोड लगत गाळे आसून सदर गाळ्यामध्ये औदुंबर जालिंदर पेटकर यांच्या मालकीचे श्री राज कलेक्शन कापड दुकान चालू होते.
सदरील दुकानांत संक्रात दिवाळी निमित्त १५ लाख रुपये किमतीचे कापड स्टॉक शिल्लक होते. अंदाजे ८.३० दरम्यान महावितरणची लाईट गेल्यामुळे दुकानातील सर्व पॉवर बंद करून दुकान मालक घरी गेले आसता काही क्षणात अंदाजे ९ ते ९.३० च्या दरम्यान महावितरणची लाईट गेलेली परत आली आणि त्याच दरम्यान सर्वीस केबल पासून शॉट सर्कीट होऊन कापड दुकानास आग लागली.
काही क्षणात पूर्ण कापड दुकानं सह मोटर इलेक्ट्रिक दुकान व हॉटेल जळून खाक झाले. महावितरणच्या गलथान चुकीच्या व निकृष्ट केबल साहित्य वापरल्या मुळे महावितरणच्याच चुकीने दुकानास शॉट सर्किट होऊन आग लागली आहे. यामध्ये सदरील दुकांनाचे फर्निचर,ड्रेस मटेरियल सह आंदाजे १५ लाख रुपये एवढया कापड साहित्यासह दुकान आगीत जळून खाक झाले आहे.
सदरील दुकान दारांनी हात उसने कर्ज घेऊन दुकान चालू केले होते त्यामुळे दुकान दारांवर कर्जाचा डोंगर वाढत आहे .तरी शासन स्तरावरुन लवकरात लवकर संबधीत दुकान मालकास नुकसान भारपाई मेळावी हि विनंती करण्यात आली आहे. अन्यथा राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने अंदोलन करण्यात येईल असे निवेदन रासपने निवेदनात म्हटले आहे.
माहितीसाठी या निवेदनाच्या प्रत, ना .नितीन राउत (उर्जामंत्री महाराष्ट्र राज्य ) मा.ना .दतात्रय( मामा) भरणे ( पालक मंत्री सोलापूर ) ,खासदार . रणजितसिंह नाईक –निंबाळकर(माढा लोकसभा ),आमदार महादेव जानकर साहेब (राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय समाज पक्ष ),जिल्हा अधिकारी सोलापूर ,उप आधिक्षक महावितरण कार्यालय करमाळा आदिंना पाठविण्यात आल्या आहेत.
Comment here