पांडे येथे लाईटचा शॉक लागून एकाचा मृत्यू..
करमाळा(प्रतिनिधी) ; करमाळा तालुक्यातील पांडे येथे आज मंगळवार दि. 5 जुलै रोजी विद्युत काम करणाऱ्या ठेकेदाराचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बिभीषण निवृत्ती दुधे (वय साधारण ४५) असे मृताचे नाव आहे. विजेचे काम करत असतानाच शॉक लागून त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे.
आज मंगळवार रोजी सायंकाळी साधारण पाच वाजताच्या सुमारास ही घटना घडली. पांडे येथे मागील काही काळात ही अशा प्रकारे विजेचा धक्का लावून दोन जणांनी आपला प्राण गमावला आहे. या दुर्दैवी घटनेने पांडे गावावर शोककळा पसरली आहे.
मृत बिभीषण दुधे हे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे ठेकेदार संतोष दुधे यांचे ते चुलत भाऊ आहेत. या अपघातानंतर दुधे यांचा मृतदेह करमाळा येथील कुटीर रुग्णालयात आणण्यात आला. आता पुढील अधिक तपास करमाळा पोलीस करीत आहेत.
हेही वाचा- बापरे! उजनीचा पाणीसाठा मायनस ‘इतक्या’ टक्क्यांवर; पाऊस अजून रुसलेलाच; शेतकरी चिंताग्रस्त
धक्कादायक! जमिनीच्या वादातून दिराने विधवा वहिनीला तिच्या मुलांसह दिले पेटवून
Comment here