करमाळा पंचायत समितीमध्ये शिवराज्यभिषेक दिन उत्साहात साजरा
करमाळा(प्रतिनिधी) ; करमाळा पंचायत समितीच्या वतीने आज शिवराज्यभिषेक दिन मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला यावेळी रयतेचा राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करमाळा पंचायत समितीचे उपसभापती दत्तात्रय सरडे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी सूर ताल संगीत विद्यालय, करमाळा चे श्री.नराळे सर व त्यांच्या विद्यार्थिनी यांनी महाराष्ट्र गीत व राष्ट्रगीताचे गायन केले.तसेच पंचायत समिती पदाधिकारी व कर्मचारी यांच्या छत्रपती शिवाजी राजे यांच्या जयघोषाने पंचायत समिती दुमदमली.
5मे रोजीच्या पर्यावरण दिनाचे औचित्य साधत उपस्तीत पदाधिकारी व कर्मचारी यांनी पंचायत समिती आवारात वृक्षारोपण चा कार्यक्रम साजरा केला.
यावेळी पंचायत समिती उपसभासती दत्तात्रय सरडे, माजी सभापती शेखर तात्या गाढे, पंचायत समिती सदस्य अतुल भाऊ पाटील, अतिरिक्त गट विकास अधिकारी राजाराम भोंग आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जारांडे साहेब यांनी केले.
Comment here