करमाळाराजकारण

विरोधकांचा फुसकाबार; करमाळा पंचायत समितीच्या सभापतीपदी पै.अतुल पाटील यांची झाली निवड

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

विरोधकांचा फुसकाबार; करमाळा पंचायत समितीच्या सभापतीपदी पै.अतुल पाटील यांची झाली निवड

करमाळा(प्रतिनिधी) ; आज अखेर करमाळा पंचायत समितीच्या सभापती पदी पै.अतुल पाटील यांची अधिकृत निवड झाली आहे. आणि विशेष म्हणजे ही निवड आज ही बिनविरोध झाली आहे.

1 जुलैला होणाऱ्या निवडीच्या वेळी आक्षेप घेणारे व सभापती निवडीवर स्थगिती आणणारे आ.संजय मामा शिंदे समर्थक पंचायत समिती सदस्य ऍड.राहुल सावंत हे निवडणूकिला उभे राहतील, असे वाटत असतानाच ही निवडणूक बिनविरोध झाली आहे.

ही निवड तहसीलदार समीर माने यांचे अध्यक्षतेखाली पंचायत समितीमध्ये आज (ता.९) झाली आहे. याकामी ११ वाजता उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ ठरली होती. त्यानुसार पै.अतुल पाटील यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली आहे.

या निवडीप्रसंगी माजी आमदार नारायण आबा पाटील गटाचे नेते व उपसभापती दत्ता सरडे, माजी सभापती गहिनीनाथ ननवरे, शेखर गाडे, युवा नेते पृथ्वीराज पाटील, प्रा. सरक, बिभिषण आवटे, राजेंद्र कदम, पंचायत समिती सदस्या केशरताई चौधरी, देवानंद बागल, विशाल गायकवाड सह पाटील गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

litsbros

Comment here