करमाळा पंचायत समितीच्या आवारात सार्वजनिक शौचालय व मुतारीची दुरावस्था; प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष
करमाळा(प्रतिनिधी) ; करमाळा पंचायत समिती आवारातील सार्वजनिक शौचालय, मुतारीची दुरावस्था झाल्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली असल्याने भुमी अभिलेख कार्यालयाकडे जातात मुतारी मधून येणारे लघुशंकेचे पाणी रस्त्यावर आल्यामुळे भुमी अभिलेख कार्यालयाकडे जातात मुतारी मधून आले घाण पाणी ओलांडून पुढे जावे लागत आहे.
परंतु याकडे प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष असल्याचा आरोप भीम आर्मीचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष उत्तरेश्वर कांबळे यांनी केला आहे.
पुढे बोलताना म्हणाले मुतारी, शौचालय यात पाण्याची सुविधा नसल्याने ते ब्लाॅक होवून लकुशंका मुख्य रस्त्यावरच आली आहे.
तो रस्ता भूमिअभिलेख कार्यालयाकडे जातो.शौचलय आणी मुतारीत मोठ्या प्रमाणात अवस्वच्छता आहे.
पंचायत समिती कडे अनेक शासकीय योजना व कामांसाठी महिला देखील येत असतात,इतरांना स्वच्छेतेचे धडे पटवून देणा-या प्रशासनाकडून चांगले काम करण्याची अपेक्षा आहे.
त्यामुळे पंचायत समिती गटविकास आधिकारी यांनी तात्काळ लक्ष दिले पाहिजे असे पत्रकारांशी बोलताना कांबळे म्हणाले.
Comment here