करमाळा

निंभोरे येथे खंडेश्वर यात्रेस सोमवार पासून प्रारंभ

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

निंभोरे येथे खंडेश्वर यात्रेस सोमवार पासून प्रारंभ

जेऊर (प्रतिनिधी); करमाळा तालुक्यातील निंभोरे येथील ग्रामदैवत खंडेश्वर यात्रेस सोमवारपासून प्रारंभ होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेले दोन वर्षापासून होत नसलेली यात्रा यावर्षी जोरदार होणार आहे. निंभोरे गावचे ग्रामदैवत खंडेश्वर देवस्थान आहे या देवाच्या दर्शनासाठी आसपासच्या गावातील भक्तजन दर्शनासाठी येत असतात त्यानिमित्ताने यावर्षीपासून मोफत महाप्रसादाचे आयोजन ही करण्यात आले आहे.

सोमवारपासून देवाच्या दर्शनासाठी आलेल्या सर्व भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन यावर्षीपासून चालू केले आहे. त्या निमित्ताने देवदर्शनासाठी आलेल्या सर्व भक्तजनांनी दर्शन घेऊन महाप्रसाद घेऊनच बाहेर पडावे अशी विनंती अन्नदात्याकडून केली गेली आहे.

देवाला यावर्षी नवीन अश्वही घेण्यात आलेला आहे. यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी गाडी ओढण्याचा कार्यक्रम मंदिरासमोर होईल. व त्या दिवशी ही महाप्रसादाचे नियोजन केले आहे.याशिवाय 29 नोव्हेंबर या दिवशी दिवसभर देवाला महाप्रसाद नैवेद्य दाखवला जातो. 

पुढे त्याच दिवशी खंडेश्वर देवाचा छबिना रात्री बारा वाजता देवळातून निघतो छबिना देवळाच्या बाहेर निघाल्यावर शोभेचे दारूकाम सोहळा पार पडणार आहे. 30 नोव्हेंबर रोजी पहाटे पाच वाजता याचा समारोप मंदिरात होणार आहे. व त्याच दिवशी सकाळी सात वाजता नंगर तोडण्याचे कार्यक्रम पार पडणार आहे.

मानाचा नंगर अण्णासाहेब वळेकर व दुसरा नंगर राजाभाऊ वळेकर असे दोन नंगर दरवर्षी तोडले जातात.व त्या दिवशी दुपारून कुस्त्याचा मोठा कार्यक्रम ठेवला आहे. या ठिकाणी भव्य निकाली कुस्तीचे जंगी नियोजन ठेवले आहे. 

शेवटची कुस्ती ही 51 हजार रुपयांची होईल त्यामध्ये संतोष जगताप शिरकोली शिवनेरी तालीम अकलूज व सुरेश ठाकूर मध्य प्रदेश तालीम सांगली यांच्यातील लढत होणार आहे. मैदानात एकही कुस्ती फिरवून लावली जाणार नाही व उशिरा आलेल्या पैलवानाचा विचार केला जाणार नाही असा नियम समस्त ग्रामस्थ कमिटीने ठेवला आहे.

कोरोणा मुळे गेल्या दोन वर्षापासून यात्रा न  भरल्यामुळे यावर्षी यात्रा जोरदार भरणार आहे कुठल्याही प्रकारची गर्दी व गोधळं न होता यात्रा पार पाडण्यासाठी गावकरी व पंच कमिटी प्रयत्न करणार आहेत

litsbros

Comment here