करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । युट्युब । व्हाट्सएप
करमाळा येथील जुन्या पिढीतील वृत्तपत्र एजंट गोकुळ घोलप यांचे निधन; सर्वत्र हळहळ
करमाळा (प्रतिनिधी); करमाळा येथील जुन्या पिढीतील वृत्तपत्र एजंट गोकुळ गणपत घोलप वय 74 यांचे अल्पशा आजाराने आज दुःखद निधन झाले गोकुळ घोलप हे अबू या टोपण नावाने परिचित होते ते गेली काही दिवसापासून आजारी होते त्यांनी सन 1988 पासून वृत्तपत्र विक्रेता व्यवसायाला सुरुवात केली होती.
जेऊर येथील वृत्तपत्र एजंट तसेच पत्रकार दिलीप घोलप तसेच करमाळा अर्बन बँकेचे संचालक दिनेश घोलप यांचे ते चुलते होत.
कोरोनाने कुटुंबप्रमुख गेलेल्या शेटफळ येथील कुटुंबाला ‘जगदीशब्द फाउंडेशन’चा आधार
त्यांच्या मागे दोन मुली जावई असा परिवार आहे यावेळी वृत्तपत्र क्षेत्रातील मान्यवर तसेच निकटवर्तीय नातेवाईक मित्र परिवार यांनी त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.
Comment here