करमाळाराष्ट्रीय घडामोडीसोलापूर जिल्हा

निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पंतप्रधान मोदींनी अखेर केला कृषी कायदा रद्द ; ऍड.सविता शिंदे यांचा आरोप

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पंतप्रधान मोदींनी अखेर केला कृषी कायदा रद्द ; ऍड.सविता शिंदे यांचा आरोप

करमाळा (प्रतिनिधी); पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज गुरुनानक जयंतीदिनी केंद्र सरकारने अध्यदेशाने लागू केलेले ३ कृषी कायदे रद्द करणार असल्याच्या घोषनेचे स्वागत करत असल्याचे ऍड. सविता शिंदे यांनी सांगितले.

ऍड. सविता शिंदे म्हणाल्या की, शेतकऱ्यांसाठी नाही पण किमान येत्या काळात पंजाब व उत्तर प्रदेशमधील निवडणुका डोळ्यापुढे ठेऊन का होईना केंद्र सरकारला शेतकरी विरोधी कायदे रद्द करावे लागले. हा एक वर्षा पासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा विजय आहे.

हेही वाचा- धक्कादायक : कौटुंबिक वादातून हत्या-आत्महत्या; नणंद-भावजयीचा मृत्यू, भावाने केले विष प्राशन

दोनच तासांत पंढरपूर ; बार्शीत पहिल्या डेमू लोकलचे स्वागत..

वर्षभरात आंदोलनातील सुमारे ७५० शेतकऱ्यांना आपले प्राण गमवावे लागले. पंतप्रधानांनी हा निर्णय लवकर घेतला असता तर या शेतकऱ्यांचे प्राण वाचले असते. गेल्या वर्षभरापासून कडाक्याची थंडी, ऊन, पाऊस कशाचीही पर्वा न करता शेतकरी आंदोलन करत आहेत. जगातले कदाचित दीर्घकाळ चाललेले हे एकमेव आंदोलन आहे.

केंद्र सरकारने ३ कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा केली असली तरी कृषी मालाच्या आधारभूत किमतीबाबत कायदा करण्याची व प्रस्तावित विज बिल विधेयक मागे घेण्याची शेतकऱ्यांची मागणी पूर्ण होणे अध्याप बाकी आहे. अशी प्रतिक्रियाही ऍड. सविता शिंदे यांनी दिली.

ऍड. सविता शिंदे म्हणाल्या की, कितीही अन्यायय, क्रूर वा पाशवी बहुमत असलेले सरकार असले तरी लोकशाहीमध्ये लोकशक्तीच्या रेट्यापुढे झुकू शकते हे शेतकरी आंदोलनाने दाखवून दिले आहे. त्यामुळे अन्याय व हुकूमशाही विरोधातली लढाई लढणे हाच चांगल्या समाजनिर्मितीसाठी पर्याय असू शकतो.

ऍड. सविता शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या या लढाईत सहभागी झालेल्या सर्व संघटनांचे अभिनंदन केले.

litsbros

Comment here