आधुनिकरणाच्या काळात बदलू लागले सणांचे स्वरूप; बदलत्या दिवाळीचा आढावा
केतूर ( अभय माने); दिवसेंदिवस आधुनिकीकरणाच्या काळात सणांचे स्वरूप बदलू लागले आहे.आता ग्रामीण भागातही कोणत्याही शिक्षणाची विशेष कौतुक होताना दिसून येत नाही त्याला दिवाळीचं ही अपवाद राहिला नसल्याची पहावयास मिळत आहे सध्याच्या आधुनिक करण्याच्या काळात सण साजरा करण्याच्या पद्धतीत मोठा बदल होत आहे.
दिवाळी म्हणजे लखलखणाऱ्या दिव्यांचा व फराळांचा तसेच फटाक्यांच्या आतषबाजीचा सण परंतु यावेळी दिव्यांचा झगमगाट दिसला परंतु फटाक्यांचा आवाज मात्र बसल्याचे दिसून आले.कोरोना प्रादुर्भावामुळे गेल्या दोन वर्षापासून सणांच्या बदलास कारणीभूत ठरला असल्याचे दिसून येत आहे.
दसरा संपताच दिवाळी सणाची ओढ लागते परंतु गेल्या काही वर्षापासून दिवाळीचे ओढ,औचित्यही संपत असून दिवाळी ही केवळ औपचारिकताच म्हणून साजरी होऊ लागली आहे.
यामध्ये फराळाच्या बाबतची म्हटले तर सध्या सर्रासपणे फराळ घरात बनवणे ऐवजी ते मिठाईच्या दुकाना मधून रेडीमेड फराळ आणण्याचे प्रस्थ वाढत आहे.
नवीन कपड्यांच्या बाबतीत म्हणावे तर ती आता इतर वेळी कोणीही कोठेही घेतले जात आहेत तर फटाक्याच्या बाबतीत तर प्रदूषणाचा मुद्दा महत्त्वाचा ठरत ठरू लागल्याने फटाक्याचा आवाजही आता बसू लागला आहे.
Comment here