करमाळाधार्मिक

करमाळा येथील आराध्य दैवत श्री कमलाभवानी मंदिर भाविकांनी गेले फुलून!

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा येथील आराध्य दैवत श्री कमलाभवानी मंदिर भाविकांनी गेले फुलून! वाचा सविस्तर

करमाळा (प्रतिनिधी) ; करमाळा तालुक्यातील श्री देवीचामाळ येथील प्रसिद्ध श्री कमलाभवानी मंदिरात बुधवारी दुर्गाष्टमी निमित्ताने भाविक भक्तांनी गर्दी केली साधारण दहा हजार भाविकांनी भवानी मातेच्या दर्शनाचा लाभ घेतला.

शक्ती पंचायतन असणा-या श्री कमलाभवानी मंदिरातील गणपती महादेव सुर्यनारायण व विष्णु लक्ष्मी देवतांचा आरती सोहळा आज सकाळी संपन्न झाला. बुधवारी रात्री ११.५५ वाजता होम हवन होणार आहे.

गुरुवारी महानैवेद्य दाखवला जाणार असून उपवास पारणे होईल.आज दुर्गा अष्टमी असल्याने भवानी मातेची सुवर्ण अलंकार भूषीत महापुजा संदिप पुजारी यांनी मांडली. चंदन मळवट भरून झेंडूच्या फुलांची मंडवळी बांधून पारंपरिक महाआरती सोहळा संपन्न झाला. शुक्रवारी विजयादशमी अर्थात दसरा साजरा होणार आहे.

सिंधू विहार सोलापूर येथील विठ्ठल रुक्मिणी सेवा भजनी मंडळाच्या महिलांनी उत्कृष्ट असा भजनाचा कार्यक्रम मंदिरामध्ये सादर केला. तसेच करमाळा येथील माही डेकोरेटरचे मंगेश गोडसे यांनी संपूर्ण मंदिर परिसरात पान व फुलांची आकर्षक सजावट करून शोभा वाढवली. करमाळा येथील जाकीर झारेकरी व शिरगीरे यांनी अल्पदरात आकर्षक लाईट माळांनी डेकोरेशन केले आहे.

राहूल नामदेवराव जगताप व संतोष जाधव यांच्या तर्फे मंदिरात भाविकांसाठी केळी वाटप करण्यात आले. महापुजेसाठी मंदिर समिती अध्यक्ष सोमनाथ चिवटे सचिव अनिल पाटील विश्वस्त डॉ ‌प्रदिपकुमार पाटील डॉ. महेंद्र नगरे, सुशील राठोड यांचेसह बापूराव पुजारी दादासाहेब पुजारी, विजय पुजारी, तुषार सोरटे, नारायण सोरटे , कमलाकर सोरटे, महेश सोरटे, अभिमान सोरटे, तुकाराम सोरटे, महेश कवादे, ओंकार पुजारी, रत्नदीप पुजारी, पुरोहित रविराज पुराणिक, रंगनाथ पुराणिक,

मानकरी शिवशंकर फुलारी, बबन दिवटे, राजेंद्र शिंदे, प्रमोद गायकवाड, शिवाजी पकाले, इंताज शेख, मनोज जामदार, श्रीकांत गोमे, रमेश माळी, ईश्वर पवार, पद्माकर सुर्यपुजारी, दिनेश पवार, राहूल सिध्देश्वर सोरटे, योगेश सोरटे, प्रकाश सोरटे, सचिन सोरटे, सागर सोरटे,

सतीश अनभुले, केतन जगताप, बापू भोसले, अमोल चव्हाण, भाऊसाहेब फुलारी व्यवस्थापक अशोक घाटे, सौरभ शास्त्री, सारंग पुराणिक, महादेव भोसले, लक्ष्मण हवालदार इत्यादी उपस्थित होते..

litsbros

Comment here