करमाळाराजकारणसोलापूर जिल्हा

करमाळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा निष्ठेचे ‘वारे..’ तर मांढरेला डच्चू! वाचा सविस्तर

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा निष्ठेचे ‘वारे..’ तर मांढरेला डच्चू! वाचा सविस्तर

करमाळा(प्रतिनिधी) ; करमाळा तालुका राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी पुन्हा संतोष वारेंची निवड करून प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील साहेब,उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, खासदार सुप्रिया ताई सुळे, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी वारेंच्या कामाला न्याय दिला आहे. तर काही काळापूर्वीच निवड झालेल्या मांढरे यास डच्चू देण्यात आला आहे.

तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कामात सततच्या कुरघोड्या होत असल्याने वारेंना अध्यक्षपदावरून काढण्यात आलं होत. परंतु प्रदेश स्तरावर याची नीटशी कुठलीही कल्पना देण्यात आली नसल्याचे निदर्शनास आले.

कोरोनाच्या काळात केलेलं काम ,प्रतिकूल काळात तालुक्यात जिवंत ठेवलेला पक्ष या सर्व कामाची दखल घेऊन पुन्हा एकवेळ संतोष वारे यांची तालुकाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.

यावेळी प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील, सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष उमेश पाटील, सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी युवकचे काँग्रेसचे वरिष्ठ जिल्हा उपाध्यक्ष अभिषेक आव्हाड उपस्थित होते.

या निवडी वरून कामाच्या कार्यकर्त्याला न्याय देवुन राष्ट्रवादीच्या बदलाचे वारे तालुका राष्ट्रवादीला किती फायदेशीर ठरणार हा येणारा काळच ठरवेल.

litsbros

Comment here