राष्ट्रवादी काँग्रेस हा महाराष्ट्राला गतिमान व वैभवशाली करणारा पक्ष, युवा नेते अभिषेक आव्हाड यांचे प्रतिपादन; करमाळयात वर्धापनदिन उत्साहात साजरा
करमाळा( प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेस हा महाराष्ट्राला गतिमान व वैभवशाली करणारा पक्ष आहे. देेशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या दूरदृष्टीने व धोरणांची उभा राहिलेला राष्ट्रवादी आज महाराष्ट्राला व देशाला दिशा देत आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा नेते अभिषेक आव्हाड याांनी करमाळयात वर्धापनदिन दिन समारंभात व्यक्त केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 22 व्या वर्धापन दिनानिमित्त आज करमाळा येथे आमदार संजय मामा शिंदे यांच्या जनसंपर्क कार्यालयात 10:10 वाजता ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी करमाळा तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व सेल चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. ज्येष्ठ नागरिक निवृत्ती लोहार यांच्या हस्ते पक्षाच्या ध्वज पूजन करण्यात आले.
राष्ट्रवादी पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त गोवर्धन चवरे, नलिनी जाधव, सोमनाथ लोहार, युवानेते अभिषेक आव्हाड यांनी मनोगत व्यक्त केले तर उपस्थितांचे स्वागत व आभार राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष वारे यांनी व्यक्त केले.
Comment here