करमाळा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे 1000 उकडलेल्या अंड्यांचे वाटप; आरोग्य दिंडी जोरात
करमाळा(प्रतिनिधी); – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 22 व्या वर्धापन दिनानिमित्त प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलेल्या आव्हानाला प्रतीसाद देत करमाळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तालुकाध्यक्ष संतोष वारे व राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक नेते अभिषेक आव्हाड यांनी 11 जून ते 20 जून दरम्यान भव्य “आरोग्य दिंडी” कार्यक्रम आयोजित केले आहे आहेत.
या आरोग्य दिंडी अंतर्गत रोज वेगवेगळे आरोग्य विषयी कार्यक्रम राबवले जातात. आज रोजी करमाळा शहरामध्ये मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने 1000 उकडलेल्या अंड्यांचे गोरगरीब व गरजू लोकांना वाटप करण्यात आले, या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाची करमाळा तालुक्यात जोरदार चर्चा असून गोरगरीब व गरजू लोक समाधान व्यक्त करत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे रोज घेण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या आरोग्य विषयी कार्यक्रमाचे नियोजन युवक नेते अभिषेक आव्हाड हे योग्य प्रकारे करून राष्ट्रवादी काँग्रेसचे विचार घरा घरात पोहचवताना दिसत आहेत.
हेही वाचा- जेऊर ग्रामपंचायतीत पुन्हा खळबळ; कुणाला दिलासा? कुणाला धक्का.? वाचा सविस्तर
करमाळा पोलिसांची वाळूमाफियांवर मोठी कारवाई; ‘या’ चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल
त्यांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष वारे, महिला तालुकाध्यक्षा नलिनी जाधव, शहराध्यक्षा राजेश्री कांबळे, युवती च्या राज्य सरचिटणीस पूजा झोळे, युवती तालुकाध्यक्षा शीतल क्षीरसागर, कार्याध्यक्षा अवचर, नंदिनी लुंगारे, किसान सेलचे तालुकाध्यक्ष सचिन नलवडे, विध्यार्थी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सर्वेश देवकर, विवेक लोहार असे अनेक कार्यकर्ते या आरोग्य दिंडी कार्यक्रम राबवण्यासाठी सक्रिय दिसत आहेत.
Comment here