करमाळाराजकारणसोलापूर जिल्हा

माजी आमदार नारायण आबा पाटील यांची ओबीसी आरक्षण लढाईत उडी; सरकारला दिला ‘हा’ इशारा

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

माजी आमदार नारायण आबा पाटील यांची ओबीसी आरक्षण लढाईत उडी; सरकारला दिला ‘हा’ इशारा

करमाळा(प्रतिनिधी) ; ओबीसींना राजकीय आरक्षण द्या  अन्यथा रस्त्यावर उतरुन आंदोलन करु, असा इशारा माजी आमदार नारायण पाटील यांनी दिला. ओबीसी आरक्षणाबाबत तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनानंतर प्रसिध्दी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

पाटील गटाच्या वतीने करमाळा मतदार संघातील ओबीसी शिष्टमंडळाने मा. आ. पाटील यांच्या नेतृत्वाखाली माननीय तहसिलदार यांची भेट घेऊन आरक्षणाबाबत एक निवेदन दिले.

याबाबत अधिक माहिती देताना मा. आ. पाटील यांनी सांगितले की करमाळा मतदार संघात सध्या ओबीसी समाजाची एकप्रकारे जणगणना सुरु असुन ओबीसी प्रवर्गात मोडणाऱ्या लोकसंख्येची तसेच मतदारांची आकडेवारी संकलित करण्याचे काम शासकीय स्तरावर होत आहे तर अधिक प्रमाणात पुर्णही झाले आहे.

बरीच समान आडनावे ही अनेक जाती प्रवर्गात आढळून येतात. यामुळे केवळ आडनावावरुन जर ओबीसी आकडेवारी गोळा केली जात असेल तर त्यात त्रुटी आढळून येतील ही बाब आम्ही प्रशासनास सांगितली.

तसेच गावोगाव ओबीसीची आकडेवारी गोळा केली गेली आहे त्यास संबंधित गावातील ग्रामसभेचीही मंजूरी असावी जेणेकरुन इंपिरिअल डाटा तयार होताना सदर माहिती अधिक सक्षम होईल. यामुळेच प्रत्येक गावात तातडीची विशेष ग्रामसभा बोलावून त्यात ओबीसी यादीचे वाचन करण्यात यावे व मंजूरीचा ठराव घेतला जावा अशी मागणीही आपण प्रशासनाकडे केली आहे.

ओबीसी समाजास राजकीय आरक्षणापासून वंचित ठेवल्यास याचा परिणाम ग्रामविकासावर होऊ शकतो यामुळे आरक्षण मिळावे ही आपली आग्रही भूमिका असल्याचे माजी आमदार नारायण पाटील यांनी स्पष्ट केले.

यावेळी माजी संचालक धूळाभाऊ कोकरे, नवनाथ झोळ, सभापती अतूलभाऊ पाटील, माजी जि प सदस्य चंद्रप्रकाश दराडे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख महेशदादा चिवटे, माळी संघाचे तालुकाध्यक्ष सुभाष जाधव, जि प सदस्य बिभीषण आवटे, बाजार समिती संचालक देवानंद बागल, बाजार समितीचे माजी संचालक बाबासाहेब बोरकर,

क्रांतीजोती संघटना तालुकाध्यक्ष शहाजी राऊत, उपसभापती गणेश चौधरी, मा उपसभापती दत्ता सरडे, बहुजन संघर्ष सेनेचे राजाभाऊ कदम सरपंच सचीन राऊत, समता परिषदेचे धनाजी ननवरे, सागर पोरे, दादा बंडगर, डाॅ पाटील, सरपंच अमर ठोंबरे, विश्वकर्मा सुतार संघटनेचे निलेश राऊत, मा उपसरपंच धनंजय शिरस्कर, धनाजी शिंदे, रावसाहेब शिंदे, आबासाहेब आंबारे, सरपंच संदिप मारकड, हबीबभाई शेख, उपसरपंच संजय तोरमल, सदस्य विनोद गरड नाना जगताप, संजय फडतरे, विशाल तकीक,

गंगाधर वाघमोडे सर, सदस्य योगेश कर्णवर, शिवशंकर माने, राजकुमार देशमुख, संतोष (बापू)  पाटील, सरपंच भारत साळवे, दादासाहेब लोंढे, सरपंच हनूमंत सरडे, प्रा अर्जूनराव सरक, इन्नुसभाई शेख, सागर गायकवाड, सोसायटी चेअरमन नाना मोटे, संतोष कोपनर आदि सह ओबीसी प्रवर्गात मोडणारे आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी तहसिलदार समीर माने यांनी निवेदन स्विकारुन यातील मागण्या व सुचनांचा जरुर विचार करु असे आश्वासन देऊन  निवेदनाची दखल  शासनस्तरावर घेतली जाईल व वरीष्ठांना याबाबत अहवाल सादर केला जाईल असा सकारात्मक प्रतिसादही दिला. सहायक पो नि जगताप यांनी तहसिल आवारात चोख बंदोबस्त ठेवला. 

litsbros

Comment here