‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत घेतलेल्या स्पर्धेत करमाळा नगरपरीषदेचा जिल्हा व राज्यात झेंडा; क्लिक करून वाचा कितवा क्रमांक आला.?
करमाळा ( प्रतिनिधी) : माझी वसुंधरा अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या स्पर्धेत करमाळा नगरपरीषद जिल्ह्यात तिसरी व राज्यात सोळावी आली असुन करमाळा नगरपरीषदेच्या शिरपेचात माना आणखी एक तुरा खोवला गेला आहे.
1 जून 2021 रोजी करमाळा नगरपरिषदेकडून ऑनलाईन सादरीकरण करण्यात आलेले होते. या अभियानांतर्गत केलेल्या कामाचे राज्यपातळीवर पर्यावरण व वातावर्णीय बदल विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडून दखल घेण्यात आलेली आहे. करमाळा नगरपरिषदेने तब्बल 67 एकर ऐवढ्या क्षेत्रावर 21 हजार झाडे लावण्याचे उद्दीष्टे समोर ठेवलेली आहेत.
त्या पैकी 8 हजार झाडे लावून झालेली आहेत, 13 हजार झाडे सामाजिक वनीकरण विभागामार्फत लावण्यात येत आहेत आहेत.शहरातील जुने झाडांचे सुध्दा करमाळा नगरपरिषदेने संवर्धनासाठी प्रयत्न केलेले आहेत.
त्यामध्ये 5500 वृक्ष आहेत व त्याची वृक्षगणना देखील सुरू केली आहे. लागवड करताना वड,पिंपळ,चिंच, इ. यासारख्या देशी प्रजातीच्या वृक्षांची लागवड मोठ्या प्रमाणात केलेली आहे.
वृक्ष लागवडी बरोबरच करमाळा नगरपरिषदेने होम मेड कंपोस्ट अंतर्गत,किचन गार्डन अंतर्गत तसेच शिवांश पद्धतीने प्रत्येक बगीचामध्ये सेंद्रिय खत निर्मीती केलेली आहे. हगणदारी मुक्तीचे ODF++ चे मुल्यांकन करमाळा नगरपरिषदेस प्राप्त झालेले आहे.
नगरपरिषदेने सात विहीरीचे मजबूतीकरण व सौंदर्यकरण करण्यासाठी काम हाती घेतलेले आहे,त्याच बरोबर शहरातील विहीरीची स्वच्छता देखिल केली आहे.जल स्त्रोताचे प्रदुषण होऊ नये म्हणून कृत्रीम तलावाची निर्मिती केली आहे.
त्यामध्ये श्री गणेश मुर्तीचे विसर्जन गेल्या 3 वर्षापासून करण्यात येत आहे. नगरपरिषदेने बांध घालून व चार निर्माण करून पाणी तलावात सोडून ” वैभव ” तलावाची निर्मिती केली आहे. त्याचबरोबर नगरपरिषदेने ESSL या केंद्रशासनाच्या योजने अंतर्गत 2700 LED लाईट या बसवलेल्या आहेत. नगरपरिषदेने विविध स्पर्धा आयेाजीत करून नागरीकांना पर्यावरणाचे महत्व पटवून दिले आहे.
यात पर्यावरणपूरक स्पर्धा, किचन गार्डनिंग स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत. त्याच बरोबर E-Pledge (ई-प्रतिज्ञा) मोठ्या प्रमाणात नगरपालिकेने घेतलेली आहे. E-Vehicle (ई-वाहन) साठी चार्चिग पॉईंट उपलब्ध करूण दिलेले आहे. आणि जन जागृती करीता ई-बाईक व साईकल रॅली इ चे आयोजन केले आहे. या पद्दतीचे उपक्रम राबविलेले आहे.
कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवून केलेले पथनाट्य,जनजागृतीपर पोवाडा हे विशेष उल्लेखनिय ठरलेले आहेत. माझी वसुंधरा अभियानांतर्गत करमाळा नगरपरीषदेला जिल्ह्यात तिसरा व राज्यात सोळावे मानांकन मिळाल्याबद्बद्द्ल सर्वत्र कौतुक होत आहे.
या सर्व आभियानासाठी मा.जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर साहेब, जिल्हाप्रशासन अधिकारी श्री .जावळे साहेब व श्री मानोरकर साहेब यांचे मार्गदर्शन लाभले.हे आभियान मा.नगराध्यक्ष वैभवराजे जगताप यांच्या नेतृत्वाखाली पार पडले.यात मा.मुख्याधिकारी वीणा पवार यांनी कामाचा योग्य आराखडा आखला व तो प्रत्यक्षात आणला.
या अभियानात शहर आभिंयंता श्री पठाण सर,तसेच बांधकाम विभाग कर्मचारी श्री फलके,श्री बाळू शिंदे यांनी अथक मेहनत घेतली.या अभियानाकरीता सर्व विद्यमान पदाधिकारी यांनी वेळोवेळी सर्व कामांना मान्यता दिली .
सर्व पदाधिकारी ,कर्मचारी, यांच्या मेहनतीमूळे अनेक कामे अभियानांतर्गत पूर्ण झाले असून त्यामुळेच हे यश मिळाले आहे अश्या भावना करमाळा नगरपरिषद नगराध्यक्ष वैभवराजे जगताप यांनी व्यक्त केल्या,.
Comment here