करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । युट्युब । व्हाट्सएप
आयुक्तांकडून करमाळा नगरपरिषदेचा आढावा
करमाळा (प्रतिनिधी); आयुक्त नगरपरिषद प्रशासन संचालनालय मुंबई यांनी राज्यातील 359 नगरपरिषद व नगरपंचायतीचा प्रशासकीय तपासणी कार्यक्रम जाहीर केला आहे त्यानुसार करमाळा नगर परिषदेत मा. आयुक्त तथा संचालक, नगरपरिषद प्रशासन संचालनालय यांच्या वतीने उपायुक्त (वित्त)तथा वित्तीय नियंत्रक श्री. अनारसे मो. शं. यांनी पाहणी केली.
पथकाने नगरपरिषदेची सन 2021-2022 आर्थिक वर्षाची तपासणी करताना प्रशासकीय कामकाज व विकास कामाचा प्रत्यक्ष आढावा घेतला.
यावेळी त्यांनी सर्व प्रशासकीय बाबी तपासून समाधान व्यक्त केले. तसेच काही सुधारणा सुचविल्या. अहवाला बाबतची माहिती मुख्याधिकारी बालाजी लोंढे यांनी दिली.
Comment here