करमाळयात ओढ्यात वाहून गेलेल्या त्या नागरिकाचा मृतदेह सापडला; नेते नागेश कांबळे व कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांना यश
करमाळा(प्रतिनिधी) : करमाळा शहरातील ओढ्यात सूर्यकांत मंडलिक हे वाहून गेल्याच संशय होता. त्यांच्या मृतदेहाचा शोध रिपाई नेते नागेश कांबळे यांच्यासह त्यांचे कार्यकर्ते कालपासून घेत होते. अखेर आज दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास सूर्यकांत मंडलिक यांचा मृतदेह या कार्यकर्त्यांना सापडला आहे. या सामाजिक कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.
सूर्यकांत मंडलिक हे करमाळा शहरातील साठेनगर या भागातील रहिवासी होते. काल सायंकाळी साडे पाचच्या सुमारास सुर्यकांत मंडलीक हे सुमंतनगर येथे बहिणीकडील घरी गेले होते. माघारी येत असताना ओढ्याच्या डाव्या बाजुने येत असताना ते पाण्यात पडले नंतर पुलाखालुन पाईप मधुन ते दुसऱ्या बाजुने बाहेर पडले त्यावेळी युवकांनी पाहिले. संबंधित प्रत्यक्षदर्शीनी ही घटना कळवली. त्यानंतर शोध सुरु झाला होता.
एकिकडे शोधमोहीम अन् दुसरिकडे प्रशासनाला जागे करण्यासाठी संघर्ष करावा लागत होोता. प्रशासनाने यात नेमकी काय भूमिका पार पडली.? नागरिकांच्या जीवाची नगरपालिका व प्रशासनाला किती काळजी आहे.?असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
https://m.facebook.com/story.php?story_fbid=3783055421804757&id=100003010096506
👆व्हिडीओ सौजन्य; प्रफुल्ल दामोदरे
हेही वाचा- गौंडरे येथील स्वस्त धान्य दुकानात गैरव्यवहार; पुरवठा अधिकारी पाठीशी घालत असल्याचा आरोप
Comment here