‘गरिब सर्वसामान्यांना एक न्याय अन नगरसेवकांना वेगळा न्याय’ हीच करमाळयाच्या मूख्याधिकारी यांची संवेदनशीलता अन कर्तव्यनिष्ठा आहे का.?
करमाळा(प्रतिनिधी) ; मंडलिक यांचा मृत्यूस प्रशासकीय बेजबाबदारपणा कारणीभूत ठरूनहि मूख्याधिकारी पवार जर संवेदनशीलता अन कर्तव्यनिष्ठेने काम करत असल्याच्या प्रतिक्रिया वृत्तमाध्यमांना देत आहेत.
कोरोनाकाळात काही सर्वसामान्यांना त्यांच्या घरातील व्यक्तींचा मृत्यू परगावी झाला असता शहरात मयतास आणण्यासाठी परवानगी दिली नाही परंतू काही नगरसेवकांच्या नातेवाईकांबाबतीत मात्र मुख्याधिकारी यांनी लेखी परवानगी दिली असून हि कसली संवेदनशीलता ? असा सवाल रिपाई पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष नागेश कांबळे यांनी केला आहे.
मयत मंडलिक यांचा मृत्यू हा केवळ पूलाला गार्ड नसल्यामुळेच झाला आहे,मंडलिक हे पाण्यात पडल्यानंतर त्यांना शोधण्याकामी जी दिरंगाई झाली ती अक्षम्य आहे ,एकीकडे मंडलिक यांचा मृतदेह आम्ही स्वतः शोधत होतो परंतू त्याच वेळी नगरपालिका प्रशासन त्या पूलावर साईड गार्ड लावून अपयश झाकण्यात व्यस्त होते.
तसेच शोधकार्यात मदतीची मागणी केली असता उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे मुख्याधिकारी यांच्यावर सदोष मनूष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे हि मागणी जोरदारपणे जनतेतून पूढं येत आहे, अशातच मुख्याधिकारी यांचा संवेदनशीलता अन कर्तव्यनिष्ठेचा दावा चूकीचा असून त्यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याच्या चौकशीसाठी आम्ही आग्रहि असून शासनदरबारी पाठपूरावा करत आहोत.
हेही वाचा- जेऊर ग्रामपंचायतीत पुन्हा खळबळ; कुणाला दिलासा? कुणाला धक्का.? वाचा सविस्तर
आता शेतकऱ्यांना पीक विम्याचा अधिक लाभ मिळणार; सरकार राबवणार हे नवे धोरण
लवकरच पालकमंत्री यांना देखील प्रत्यक्ष भेटणार आहोत.मंडलिक यांचं कूटूंब उघड्यावर आलेले आहे.त्यांना शासकीय मदतीची मागणी देखील करणार आहोत.मुख्याधिकारी यांच्या प्रतिक्रियेवर सर्वसामान्यांमधून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत.
कोरोनाचे संकट घोंगावत असताना लोकांवर उपासमारीची वेळ आली असता अतिक्रमणाच्या नावाखाली सुशिक्षित बेरोजगार यूवकांचे व्यवसाय उद्ध्वस्त करून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आणायला वेळ आहे आणि एक मागासवर्गीय व्यक्ती ओढ्यातून वाहून गेल्यावर त्याचा शोध दोन दिवस लागत नाही आपण स्वतः तिथं हजर राहत नाहीत ,आपले कर्मचारी जेसीबी मिळत नाही सांगतात, गोरगरीब व बेरोजगार यूवकांचे अतिक्रमण काढायला मात्र लगेच यंत्रणा सूसज्ज असते हिच का मुख्याधिकारी यांची संवेदनशीलता.? नागेश कांबळे जर त्या कूटूंबाच्या मदतीला धावून गेले नसते तर मयत मंडलिक यांचा मृतदेह अद्यापपर्यंत सापडला नसता,आज उघड्यावर आलेल्या मंडलिक कूटूंबाला मदतीची गरज आहे,आधाराची गरज आहे, एक जबाबदार व संवेदनशील अधिकारी म्हणून आपण त्यांची भेट घेतली का?
– हणूमंत मांढरे,तालूका कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, करमाळा
Comment here