करमाळासोलापूर जिल्हा

घरोघरी राष्ट्रध्वजाची उभारणी करा; भारतरत्न डॉ.एपीजे अब्दुल कलाम फाउंडेशनच्या वतीने करमाळाकरांना आवाहन; मुस्लिम मोहल्ला येथे कार्यक्रमाचे आयोजन

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

घरोघरी राष्ट्रध्वजाची उभारणी करा; भारतरत्न डॉ.एपीजे अब्दुल कलाम फाउंडेशनच्या वतीने करमाळाकरांना आवाहन; मुस्लिम मोहल्ला येथे कार्यक्रमाचे आयोजन

करमाळा(प्रतिनिधी) ; भारत देशाच्या स्वातंत्र्याल्या 15 ऑगस्ट रोजी 75 वर्ष पूर्ण होत आहे या पार्श्वभूमीवर करमाळा शहर व तालुक्यात दिनांक 13 ऑगस्ट ते दिनांक 15 ऑगस्ट या दरम्यान शासनाचा ” हर घर तिरंगा “हा विशेष उपक्रम राबविला जाणार आहे यामध्ये सर्व नागरिकांनी सहभागी होऊन प्रत्येकांनी आपल्या घराच्या इमारती वर दुकानावर तिरंगा झेंडा लावुन सहभाग घ्यावा असे आवाहन भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम फाउंडेशन करमाळा यांनी केले आहे.


 

तमाम भारत वासीयांच्या मनात स्वातंत्र्य लढ्यांच्या स्मृती तेवत राहव्यात देश स्वातंत्र्य करण्यासाठी ज्यांनी बलिदान दिले त्या शहीद .क्रांतीकारक .व अज्ञात नायकांचे व स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटनांचे स्मरण व्हावे

आपल्या देश भक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरुपी जनमानसात रहावी आपल्या देशाप्रती भक्ती सह कृतज्ञतेची जाणीव वृद्धींगत व्हावी हाच हया मागचा उद्देश आहे त्या मुळे तमाम नागरिकांनी आप आपल्या घराच्या इमारती वर दुकानावर “” हर घर झेंडा “” हा शासनाने दिलेला उपक्रम राबविण्यासाठी राष्ट्रध्वजाची उभारणी करून या उपक्रमात सहभागी व्हावे.

तसेच ज्या ठिकाणी ध्वज लावण्यात येणार आहे अश्या प्रत्येक ठिकाणी काळजीपूर्वक त्याची प्रतिष्ठा राखुन तो स्पष्ट पणे दिसेल अश्या रितीने लावण्यात यावा तसेच महाराष्ट्र शासनाकडून व जिल्हा प्रशासना कडुन ज्या मार्गदर्शक सूचना प्रसारित होईल त्या सर्व नियमांचे शंभर टक्के पालन करून राष्ट्रध्वजाची उभारणी करावी असे आवाहन यांनी केले आहे.

हर घर झेंडा या उपक्रमासाठी करमाळा तालुक्याचे तहसीलदार संमीर माने व करमाळा पोलीस स्टेशन चे निरीक्षक सुर्यकांत कोकणे साहेब , करमाळा नगरपालिका चे मुख्याधिकारी बालाजी लोंढे साहेब व जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक नरसिंह चिवटे साहेब यांच्या शुभहस्ते भारतीय तिरंगा ध्वजा चे वाटप होणार आहे.

हाजी अल्ताफ शेठ तांबोळी नगरसेवक, हाजी कलीम काझी सर, माझी नगराध्यक्ष श्री युसुफ नालबंद, अॅड बाबुराव जी हिरडे साहेब, आदी मान्यवरांच्या उपस्थितीत येत्या 10 ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता करमाळा येथील मुस्लिम मोहल्ला येथे सदरचा उपक्रम पार पडणार आहे.

सदरच्या या कार्यक्रमाला करमाळा शहरातील नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे

litsbros

Comment here