करमाळाधार्मिक

मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त करमाळ्यात अहले सुन्नत जमात च्या वतीने धार्मिक व्याख्यानाचे आयोजन

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त करमाळ्यात अहले सुन्नत जमात च्या वतीने धार्मिक व्याख्यानाचे आयोजन

करमाळा(प्रतिनिधी); इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त जशन ए ईद ए मिलाद उन नबी अहले सुन्नत जमात करमाळा च्या वतीने हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जीवनावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.

परंडा जिल्हा उस्मानाबाद येथील मौलाना मलिक हाफिज तसेच करमाळा येथील मौलाना हापिज मुजाहिद सय्यद यांचे हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जीवनचरित्रावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर व्याख्यानाचा कार्यक्रम करमाळा शहरातील कब्रस्तान जवळील मशीद सुलेमानि या मशिदी मध्ये सायंकाळी पाच ते सात वाजेपर्यंत आयोजन करण्यात आले असून संध्याकाळी सात वाजता मगरीब नमाज नंतर महाप्रसादाचे लंगर खाना आयोजन करण्यात आली आहे.

सदर धार्मिक कार्यक्रमाचा लाभ करमाळा शहर व तालुक्यातील मुस्लिम समाज बांधवांनी घ्यावा असे आवाहन अहले सुन्नत जमात च्या वतीने करण्यात आली आहे.

litsbros

Comment here