करमाळाधार्मिक

करमाळा शहरात हिंदु मुस्लिम एकतेचे प्रतिक असलेला मोहरम मोठया उत्साहात साजरा होणार

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा शहरात हिंदु मुस्लिम एकतेचे प्रतिक असलेला मोहरम मोठया उत्साहात साजरा होणार

जेऊर (प्रतिनिधी) ; करमाळा शहरात हिंदु मुस्लिम एकतेचे प्रतिक असलेला मोहरम मोठया उत्साहात साजरा होणार असल्याचे शौकत नालबंद अध्यक्ष मोहरम कमिटी यांनी सांगितले आहे. करमाळा शहरात सर्वधर्म समभावाचे प्रतिक असलेला मोहरम सण शांततेत मोठ्या उत्साहात साजरा करण्याचे ठरले आहे.

करमाळा शहर मोहरम कमिटीची बैठक मा नगराध्यक्ष तथा मोहरम कमिटीचे अध्यक्ष शौकत नालबंद यांच्या अध्यक्षतेखाली संप्पन झाली.या बेठकीत सवारी स्थापना करण्याचे नियोजन ठरवले आहे.

सर्व धर्मसमभावाचे हिंदु मुस्लीम एकतेचे प्रतिक असलेले किल्ला विभाग येथील नालसाहब या मानाची सवारीसह करमाळा शहरात मोहद्दीन तालीम येथील जाकीर वस्ताद यांची इमाम कासम यांची सवारी कुंभार गल्ली येथील राजु परदेशी यांची अल्लादीन सवारी खाटीक गल्ली येथील बिलालभाई यांची नालेहैदर भवानीपेठ येथील स्वातंत्र सैनिक कैलासवासी बाबू हामजे खान वस्ताद व

मोहम्मद शरीफ शेख यांची लालनसाहब सवारी मोहल्ला गल्लीतील हाजी समीर बावा यांची नालेहैदर सुतारगल्ली येथील शंकर हवालदार यांची पांच पंजे,रंभापुरा येथील बबन दुधाट यांची मक्कदुम अल्लाउद्दीन सवारी,सुमंतनगर येथील दादा अडसुळ अल्लाऊद्दीन अर्जुन राऊत यांची पीर सवारी,

गंवडी गल्ली येथिल निसार झारेकरी यांची सवारी मोलालीनगर येथील मदारी बांधवाची सवारी ,फारूक कुरेशी यांची पंजाब वस्ताद चौकमधील तसेच मानाच्या डोले आघाडीचा तैमुर सय्यद यांचा हाजी उस्मान सय्यद किल्ला वेस येथील पांढरी ताजा,

सुमंतनगर येथीद नारायण जाधव यांचा डौला गंवडी गल्लीतील जाकीर राजा यांचा ताजा बसवण्यात आले. या बैठकीला हाजी उस्मान सय्यद,हाजी अल्ताफशेठ तांबोळी, जाकिर वस्ताद,हाजी फारूक बेग,फारूक जमादार,मुक्तार पठाण,जाफर घोडके,हाजी समीरबावा शेख,मैनेद्दीन शैख राजु परदेशी,बबन दुधाट सुर्यकांत चिवटे लब्बु हलवाई ,

लक्ष्मण भोसले,सारंग परदेशी,झुंबर परदेशी,शंकर हवालदार,बिलाल कुरेशी,हाजी मस्जिद घोडके,जाकिर पठाण,इम्रान वस्ताद,हाजी महमंदअली शेख,फारुक कुरेशी,मंजुर कुरेशी,सचिन माहुले,देविदास घोडके,रफिक शेख,मुद्दसर दारुवाले उपस्थित होते.

 

litsbros

Comment here