करमाळाधार्मिकसोलापूर जिल्हा

करमाळा येथील सामाजिक आदर्श; गणेश विसर्जन मिरवणुकीवर मशिदीवरून पुष्पवृष्टी, राष्ट्रीय एकात्मतेचे झाले आगळे वेगळे दर्शन

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा येथील सामाजिक आदर्श; गणेश विसर्जन मिरवणुकीवर मशिदीवरून पुष्पवृष्टी, राष्ट्रीय एकात्मतेचे झाले आगळे वेगळे दर्शन

करमाळा (अलीम शेख): करमाळा शहरातील गणेश विसर्जनावर जामा मशिदी मधून हार व फुले अशा पद्धतीने पुष्पवृष्टी करून शहरातील मुस्लिम बांधवांनी समाजासमोर एक आगळा वेगळा राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश ठेवला आहे

शहरातील वेताळ पेठ येथील जामा मशिदी मधून गणेश विसर्जनाच्या दिवशी मुस्लिम बांधवांनी मशिदीसमोर येणाऱ्या शहरातील सर्व गणेश मंडळा च्या अध्यक्षांचा सत्कार मशिदीसमोर येणाऱ्या सर्व प्रत्येक विसर्जन मिरवणुकीवर पुष्पवृष्टी करून समाजासमोर एक प्रकारे वेगळा आदर्श ठेवला आहे.

सदरचा उपक्रम हा गेली कित्येक वर्षांपासून मुस्लिम बांधव राबवीत असल्याची माहिती हाजी उस्मान सय्यद यांनी बोलताना दिली.

https://youtube.com/shorts/QkpsKPEeJ9Q?feature=share

सदरचा उपक्रम यशस्वीरित्या राबवण्यासाठी फारुख जमादार, अश्फाक जमादार, हाजी उस्मान सय्यद, पिंटू बेग, जाकीर वस्ताद, मुलकान पठाण, युसुफ बागवान, कासम सय्यद, तसेच जमीर सय्यद आदींनी विशेष परिश्रम घेतले.

करमाळा शहरातील 125 वर्षाची परंपरा असलेला श्रीदेवीचा माळ येथील राजे राव रंभा तरुण मंडळाचा गणपती याशिवाय राशीन पेठ तरुण मंडळ, गजराज तरुण मंडळ, लोकमान्य टिळक तरुण मंडळ ,सरकार मित्र मंडळ, सहकार मित्र मंडळ, जय महाराष्ट्र तरुण मंडळ, नेताजी तरुण मंडळ, तानाजी तरुण मंडळ,हिंदवी तरुण मंडळ आधी गणेश मंडळाचे विसर्जन शांततेत पार पडले

गणेश विसर्जन शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस उपविभागीय अधिकारी डॉक्टर प्रशांत हिरे तसेच पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यानी विषेश पोलिस बंदोबस्तही ठेवला होता.

litsbros

Comment here