करमाळाकेमसोलापूर जिल्हा

खासदार निंबाळकर यांचा करमाळा तालुक्यातील केम येथे पहिल्यांदाच जनता दरबार; जनतेच्या रोषाचा करावा लागला सामना, ‘या’ प्रश्नांवरून केमकर आक्रमक, तर रेल्वेमंत्री दानवे नॉटरीचेबल!

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

खासदार निंबाळकर यांचा करमाळा तालुक्यातील केम येथे पहिल्यांदाच जनता दरबार; जनतेच्या रोषाचा करावा लागला सामना, ‘या’ प्रश्नांवरून केमकर आक्रमक, तर रेल्वेमंत्री दानवे नॉटरीचेबल!

केम (प्रतिनिधी संजय जाधव) ; करमाळा तालुक्यातील केम येथे प्रथमच माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार रणजितसिंह निंबाळकर याना जनता दरबारात जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागले.

माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह निंबाळकर निवडून गेल्यापासून प्रथमच केम येथे त्यांच्या उपस्थितीत येथील विठ्ठल मंदिरात जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष पदी माजी जिल्हा परिषद सदस्य जेष्ठ नेते दिलीप दादा तळेकर होते.

यावेळी खासदार साहेबासमोर प्रवासी संघटनेच्या वतीने केम येथील जिव्हाळयाचा प्रश्न म्हणजे, रेल्वे केम स्टेशन वर कायम झालेल्या गाडयाचा थांबा रद् केला. त्यामुळे विदयाथीं, प्रवासी, कुंकू कारखानदार यांची गैरसोय झाली आहे. रेल्वे नसल्याने मुली महाविद्यालयीन शिक्षणापासून वंचित राहल्या आहेत.

रेल्वे विभागाकडे निवेदन देऊनही त्याचा उपयोग झाला नाही, तुम्ही आताच रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे याना फोन करा असा आग्रह ग्रामस्थांनी धरला त्यानतर खासदार साहेबानी रेल्वे मंत्र्यांना फोन वर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पंरूतु नाॅटरिचीबल लागत होता.

त्यानतर त्यानी मी स्वतः मंत्रालयात जाऊन दानवे साहेबाची भेट घेऊन येथील प्रश्न मांडेन असे आश्वासन त्यानी दिले. तर येथील अरूण लोंढे,बाळू तळेकर,दिपक सुरवसे यानी केमला जोडणारा रस्त्याची परिस्थिती सांगितली. या वेळेस रस्त्याचे प्रश्नांसाठी करमाळा येथे बैठक, लावू आश्वासन दिले.

तसेच केम येथील कुंकू कारखानदार संघटनेचे धनजंय सोलापूरे, मनोज सोलापूरे यानी कारखान्यासाठी वीज कमी पडते या साठी पाच के,व्ही टा्न्स फाॅर्मची मागणी केली तसेच जिल्हा परिषद शाळेजवळिल धोक्याचा डिपी,त्वरीत काढून दुसऱ्या ठिकाणी बसवावा असी मागणी शिक्षकानी केली.

यावर खासदार साहैब यांनी वीज वितरण अधिकारी याना सूचना दिल्या वडार समाजासाठी खासदार निधीतून व्यायाम शाळेतील साहित्यासाठी व विकास कामांसाठी तीस लाख रुपये मंजूर केले.

प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष संदीप तळेकर, प्रवासी संघटनेचे अध्यक्ष पिंटू ओहोळ यानी केम हे करमाळा तालुक्यातील सर्वात मोठे शहर गाव आहे या गावापासून तालुक्याचे अंतर32कि,मीअंतरावर आहे त्यामुळे जेष्ट नागरिकांची गैर सोय होती य तरी केम येथे अप्पर तहसिल कार्यालय व्हावें असा प्रश्न उपस्थित केला.

हा प्रश्न त्यरीत मंजूर करु या वेळी श्री ऊत्तरेश्वर हायस्कूल चे प्राचार्य कदमसर व अमोल तळेकर यानी शाळेचे निवेदन दिले काहि छोटे प्रश्न जागेवर मिटविले, या वेळी कोव्हिड काळामध्ये केम प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ संतोष पालखे यानी आदर्श काम केल्याबद्दल त्यांचा सत्कार खासदार निंबाळकर यांनी केला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष दिलीप,दादा तळेकर म्हणाले आमच्या गावाची एकच मागणी ती म्हणजे रेल्वे चे थांबे पुर्व वृत करणे व केम येथे रेल्वे उड्डाणपूल हे दोन प्रश्न खासदार साहेबानी सोडवावे आम्ही पुन्हा त्याना खासदार म्हणून निवडून देऊ केमचे प्रश्नः खासदार साहेब मागीं लावतील असा आसावाद त्यानी व्यक्त केला.

यावेळी व्यासपीठावर करमाळा भाजपाचे तालुकाध्यक्ष गणेश चिवटे, किरण बोकण, केम शहराध्यक्ष गणेश आबा तळेकर, उपाध्यक्ष दत्ता तळेकर, युवा सेनेचे सागर तळेकर, कुंकू कारखानदार राजेंद्र गोडसे, ऊपस्थित होते.

या जनता दरबारात कुंकू, कारखानदार,व्यापारी वर्ग ग्रामपंचायत सदस्य सर्व विभागाचे अधिकारी, गावातील सर्व संघटनेचे कार्यकर्ते, शेतकरी पोलीस प्रशासन ऊपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपसरपंच नागनाथ तळेकर यानी केले तर आभार विकास कळसाईत यानी मानले.

litsbros

Comment here