करमाळासोलापूर जिल्हा

अल्पसंख्यांक विभागाकडून करमाळा तालुक्यासाठी 1 कोटी निधी मंजूर; आमदार संजयमामा शिंदे यांची माहिती

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

अल्पसंख्यांक विभागाकडून करमाळा तालुक्यासाठी 1 कोटी निधी मंजूर; आमदार संजयमामा शिंदे यांची माहिती

करमाळा(प्रतिनिधी) ; अल्पसंख्यांक बहुल ग्रामीण क्षेत्रात मूलभूत पायाभूत सुविधा उपलब्ध करून देऊन ग्रामीण भागात वास्तव्यास असलेल्या अल्पसंख्यांक लोकसमूहातील नागरिकांच्या जीवनमानात उन्नती करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्यांक विभागाकडून 159 कोटी 36 लाख रुपयांचा निधी मंजूर केला असून त्यापैकी करमाळा तालुक्यासाठी 1 कोटी निधी मंजूर झाला असल्याची माहिती करमाळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजयमामा शिंदे यांनी दिली.

या निधीमधून उमरड, कंदर ,जातेगाव वडगाव उत्तर या गावांमध्ये कबरस्तान संरक्षण भिंत बांधणे तसेच अंतर्गत रस्ता करणे व सपाटीकरण यासाठी प्रत्येकी 7 लाख रुपये निधी मंजूर झालेले असून रावगाव , कामोणे, महेसगाव ,कुर्डू, लहू, पापनस, रोपळे क, सापटणे, उपळवटे ,दहिवली,

अकुलगाव या गावातील कब्रस्तान संरक्षक भिंत बांधणे तसेच अंतर्गत रस्ता व सपाटीकरण करण्यासाठी प्रत्येकी 6 लाख याप्रमाणे 1 कोटी निधी प्राप्त झालेला आहे अशी माहिती आमदार संजय मामा शिंदे यांनी दिली.


या निधीमधून वर्षानुवर्ष दुरावस्थेत असलेल्या अल्पसंख्यांक समाजाच्या कब्रस्तान च्या सुधारणेसाठी उपयोगी पडेल अशी अपेक्षा आ.संजयमामा शिंदे यांनी व्यक्त केली.

litsbros

Comment here