आरोग्यकरमाळाराजकारणसोलापूर जिल्हा

आमदारांवर टीका करणाऱ्या सभापती साहेबांनी कोरोना काळात कोणाला काय मदत केली.? आणि कोणते काम केले.? हे जरा जनतेला सांगावे; पंचायत समिती सदस्य प्रतिनिधीची टीका

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

आमदारांवर टीका करणाऱ्या सभापती साहेबांनी कोरोना काळात कोणाला काय मदत केली.? आणि कोणते काम केले.? हे जरा जनतेला सांगावे; पंचायत समिती सदस्य प्रतिनिधीची टीका

करमाळा(प्रतिनिधी) ;  करमाळा माढा विधानसभा मतदार संघाचे आ. संजयमामा शिंदे हे फक्त कोरोना सेंटरला भेटी देत आहेत. यापेक्षा त्यांनी ऑक्सिजन अभावी मरणाऱ्या लोकांकडे लक्ष द्यावे अशा प्रकारची टीका पंचायत समितीचे सभापती गहिनीनाथ ननवरे यांनी आमदार शिंदे यांच्यावरती केली होती केली. या टीकेचा खरपूस समाचार पंचायत समितीचे सदस्य प्रतिनिधी दत्ता जाधव यांनी घेतला आहे.

कोरोना च्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत आ. संजयमामा शिंदे यांनी जे कार्य केले आहे ते फक्त तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात कौतुकास पात्र आहे हे सर्व जनतेलाही ज्ञात आहे. परंतु झोपेचे सोंग घेतलेले विरोधक मात्र वस्तुस्थिती माहीत असूनही विनाकारण आपले अकलेचे तारे तोडतात आणि विद्यमान आमदार ह्यांच्यावर पात्रता नसतानाही टीका करतात. असे जाधव म्हणाले.

त्यामुळे अशा विरोधकांनी आपण कोरोना काळात काय दिवे लावले हे अगोदर जनतेला सांगावे व आ. संजयमामा शिंदे यांनी काय काम केले आहे हेही आपण समजून घ्यावे असे आवाहन श्री दत्ता जाधव यांनी केले आहे.

कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत आ. संजयमामा शिंदे यांनी जवळपास दोन कोटी रुपयाची साधनसामग्री कोरोना निर्मूलनासाठी आमदार निधीतून मतदारसंघासाठी खरेदी केलेली आहे .कुर्डूवाडी आणि करमाळा यासाठी प्रत्येकी 40 लाख रुपये किमतीच्या दोन अध्यावत रुग्णवाहिका खरेदी केलेल्या आहेत.

तसेच कोरोना च्या पहिल्या लाटेत अत्यावश्यक साधनसामुग्री खरेदी करण्यासाठी 40 लाख निधी आणि दुसऱ्या लाटेत केम, कोर्टी ,साडे ,वरकुटे ,पिंपळनेर, रोपळे या सहा प्राथमिक आरोग्य केंद्र आणि करमाळा उपजिल्हा रुग्णालय व जेऊर ग्रामीण रुग्णालय यांच्यासाठी 67 लाख रुपयाचा निधी त्यांनी दिलेला आहे आणि त्यानुसार प्रत्यक्ष साधनसामग्री खरेदी करण्याची प्रक्रिया तातडीने सुर केलेली आहे.

हेही वाचा- करमाळयात लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 14 दुकानांवर कारवाई तर एक दुकान सील; वाचा सविस्तर

रावगाव कोवीड सेंटर मध्ये बरे झालेल्या रुग्णांवर पुष्पव्रष्टी करून डिस्चार्ज

एवढ्यावरच आमदार शिंदे यांचे काम थांबत नाही तर त्यांनी गेल्या 3 वर्षापासून बंद असलेले जेऊर येथील ग्रामीण रुग्णालय कार्यान्वित करून त्या ठिकाणी डेडिकेटेड को वीड केअर सेंटर सुरू केलेले आहे .त्याठिकाणी 10 ऑक्सिजन बेड उपलब्ध केलेले आहेत . करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयात 30 ऑक्सीजन बेडची सुविधा सध्या सुरू आहे. ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रातही ऑक्सीजन बेड ची सुविधा देण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. त्यासाठीची प्रक्रिया सध्या सुरू आहे.

मतदारसंघात जवळपास 100 ऑक्सीजन बेडची सुविधा त्यामुळे निर्माण होणार आहे.याबरोबरच जिल्ह्याला लसीचा कोठा वाढवून मिळावा यासाठी आरोग्य मंत्र्यांशी आ. संजयमामा शिंदे हे बोललेले आहेत.तालुक्याला ऑक्‍सिजनचा तुटवडा भविष्यकाळात जाणवू नये म्हणून उपजिल्हा रुग्णालय करमाळा या ठिकाणी ऑक्सीजन जनरेशन प्लांट सुरू करण्याचे मागणी पत्र आमदार शिंदे यांनी दिलेले असून त्या मागणीची दखल आरोग्यमंत्र्यांनी घेतलेली असून ऑक्सीजन जनरेशन प्लांट लवकरच सुरू होणार आहे.

त्यामुळे मतदार संघातील व्हेंटिलेटर बेड , ऑक्सीजन चा तुटवडा ,लसीकरण याची काळजी सभापतींनी आणि त्यांच्या नेत्यांनी करू नये त्यासाठी विद्यमान आमदार सक्षम आहेत .या कोरोना काळात पेपरबाजी करण्यापेक्षा आपण वेगळे काय दिवे लावले असतील तर ते जनतेला एकदा सांगावे असे थेट आव्हान दत्ता जाधव यांनी दिले आहे.

litsbros

Comment here