करमाळाक्राइम

उंदरगावच्या भोंदू मनोहर भोसलेसह साथीदारांवर बलात्कार व गँगरेपचा गुन्हा दाखल; रोज उघड होत आहेत नवनवे गुन्हे

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

उंदरगावच्या भोंदू मनोहर भोसलेसह साथीदारांवर बलात्कार व गँगरेपचा गुन्हा दाखल; रोज उघड होत आहेत नवनवे गुन्हे

करमाळा (प्रतिनिधी) ;  उंदरगाव तालुका करमाळा येथील तथाकथित मनोहर भोसले या महाराजावर करमाळा पोलीस स्टेशन येथे बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. भोंदूगिरी करणाऱ्या महाराजा सहित त्यांच्या तीन साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने करमाळा शहर तसेच परिसरात एकच गोंधळ उडाला आहे.

याबाबत जिल्हा पोलिस कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मनोहर भोसले यांच्यासह त्यांच्या साथीदारांवर कलम 385, 376, 354 तसेच अंधश्रद्धा निर्मूलन समिती कायदा कलम अंतर्गत तीन अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हा गुन्हा सातारा जिल्ह्यातील पीडितेने दिलेल्या तक्रारीनंतर दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी डॉक्टर विशाल अहिरे हे स्वतः करीत आहे.

हेही वाचा- करमाळा शहर व तालुक्यात राजरोसपणे होतेय गुटखा विक्री; दररोज लाखोंची उलाढाल; गुटख्यामुळे तालुक्यातील दोन तरुणांचा मृत्यू

अभिषेक व भेटीसाठी अडीच लाख घेतले, आणि.. भोंदू मनोहर भोसलेसह अजून दोघांवर करमाळयात नव्हे तर बारामतीत गुन्हा दाखल

 

भोंदूगिरी करणारे मनोहर भोसले यांच्यावर यापूर्वी करमाळा पोलिसात विविध गुन्हे दाखल झाले आहे आता आज गुरुवार रोजी त्यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याने करमाळा शहर परिसरात भलतीच खळबळ माजली आहे.

याबाबत करमाळा पोलीस लवकरच भोंदूगिरी करणाऱ्या महाराजांचा मुसक्या आवळणार असे चित्र सध्या दिसत आहे.

litsbros

Comment here