आरोग्यकरमाळा

मांजरगाव मध्ये नेत्र तपासणी व अल्प दरात चष्मे वाटप शिबिर संपन्न; ‘इतक्या’ रुग्णांची झाली तपासणी

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

मांजरगाव मध्ये नेत्र तपासणी व अल्प दरात चष्मे वाटप शिबिर संपन्न; ‘इतक्या’ रुग्णांची झाली तपासणी

केत्तूर (अभय माने); मौजे मांजरगाव येथे श्री टेक आय क्लिनिक सांगली व ग्रामपंचायत मांजरगाव यांचे संयुक्त विद्यमाने नेत्र तपासणी शिबिर व अल्प दरात चष्मे वाटप शिबिर आयोजित करण्यात आले होते. आज सकाळी ९:०० वाजता शिबिरास छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रतिमापूजनाने सुरुवात करण्यात आली.

मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून शिबिर सुरू झाले या शिबिरामध्ये मौजे मांजरगाव येथील 95 नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली.नेत्र तपासणी केल्यानंतर आवश्यक त्या प्रत्येक रुग्णास अल्प दरात चष्मे वाटप करण्यात आले या शिबिरामध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रियेचे 12 रुग्ण आढळले.

त्यांची श्री टेक आय क्लीनिक सांगली यांचे कडून मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे त्यांना सांगलीला जाण्या येण्याची सुविधा क्लिनिक मार्फत करण्यात येणार आहे तसेच शस्त्रक्रिया झाल्यानंतर रुग्णांना राहण्याची तसेच जेवणाची सोय क्लिनिक मार्फत करण्यात येणार आहे.

श्री.गोकुळ आरकिले वस्ताद यांचे हस्ते शिव छत्रपतींच्या प्रतिमेचे पूजन करून शिबिरास सुरुवात झाली यावेळी ग्रामपंचायतचे सरपंच प्रतिनिधी माजी सरपंच महेश कुलकर्णी ,उपसरपंच आबासाहेब चव्हाण , शाळा व्य. समिती अध्यक्ष सुभाष गरदडे ज्ञानदेव चव्हाण, मधुकर चव्हाण, भिमराव चव्हाण,.संतराम चव्हाण, साधु पाटील, छगन जावळे,ग्रा.पं. कर्मचारी मामु खरात, श्री.टेक क्लिनिक चे डॉ. सोमनाथ बोराटे, डॉ. संदीप चव्हाण, ज्ञानदेव काकडे तसेच बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी बोलताना श्री.टेक चे डॉक्टर म्हणाले कि गाव पातळीवर आशा प्रकारची शिबिर आयोजित करून आम्हाला सेवा करण्याची आपण संधी उपलब्ध करून दिली त्याबदद्ल क्लिनिक च्या वतीने आम्ही ग्रामपंचायत च्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानतो यापुढेही आपण जर संधी दिली तर मोठ्या स्वरूपा मध्ये विविध आजारांवर चे तपासणी शिबिर आपण गावामध्ये आयोजित करून आवश्यक असणाऱ्या शस्त्रक्रिया महात्मा फुल जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून मोफत करून देऊ 

तसेच लहान मुलांची तपासणी देखिल या शिबिरात करू महिलांच्या अनेक समस्या असतात त्यासाठी महिला डॉक्टरांकडून तपासणी व योग्य उपचार तसेच मार्गदर्शन केले जाईल यासाठी पुढील आठवड्यात त्याचे योग्य नियोजन आपण करू.

यावेळी महेश कुलकर्णी व आबासो चव्हाण यांनी हे शिबिर पुढील आठवड्यात आयोजित करण्यास आम्ही नक्कीच सहकार्य व नियोजन करू असे आश्वासन डॉक्टरांना दिले तसेच आज च्या नेत्र तपासणी शिबिरा प्रमाणे पुढील आरोग्य तपासणी शिबिरास गावातील तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थ जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहतील.

विशेष करून महिला ,वृद्ध व्यक्ती उपस्थीत राहुन शिबिराचा लाभ घेतील असा आशावाद व्यक्त केला व श्री.टेक आय क्लिनिक च्या टिम चे आभार मानले .

litsbros

Comment here