करमाळा तालुक्यातील मांजरगाव येथे महाराष्ट्र दिनी सैनिक मातेच्या हस्ते ध्वजारोहन
केतूर (अभय माने) 1 मे आज संपुर्ण महाराष्ट्रात कामगार दिन व महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न होत असताना मांजरगाव (ता. करमाळा) येथे जिल्हा परीषद शाळेत ध्वजारोहन करण्यात आले.
यावेळी युवानेते मकाई सह. साखर कारखान्याचे संचालक मा.संतोष आप्पा पाटील यांच्या सर्वसमावेशक व सर्व थरातील लोकांना सोबत घेऊन गावकारभार करण्याच्या धोरणातुन व संकल्पनेतुन राष्ट्रप्रेमाच्या सद्भावनेतुन एक अभिनव कल्पना समोर आली.
आजचे ध्वजारोहन सध्या दिल्ली येथे भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेले मेजर आजिनाथ निकत यांच्या विधवा माता श्रीमती वैशाली दत्तु निकत यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
ज्यांच्या जिवावर आपण बिनधास्त रात्रीची झोप घेतो आशा सैन्यदला बदल असलेली कृतज्ञता यातुन स्पष्ट होते. देशाच्या सेवेसाठी आपले संतान सपर्पित करणाऱ्या माता पितांचा समाजातुन सन्मान व्हावा या उदात्त हेतूने हा ध्वजारोहन सोहळा त्यांचे हस्ते पार पडला.
कालच मुख्य कार्यकारी अधिकारी मा.दिलीप स्वामी यांच्या मार्गदर्शनानुसार आजी माजी सैनिक व त्यांच्या माता पित्यांचा सन्मान सोहळा संपन्न झाला होता.
आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन श्री.जाधव सर यांनी केले सर्व शिक्षक वर्गानी उपस्थीत मान्यवरांचा सन्मान केला यावेळी कार्यक्रमास उपस्थित असलेले मेजर शहाजी चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त केले .
बोलताना ते म्हणाले की मुलांना घडवत असताना शिक्षकां बरोबरच पालकांची ही जबाबदारी महत्वाची आहे.आपली मुले विविध क्षेत्रात चमकली पाहीजेत शिक्षणा बरोबरीने खेळ, मल्लविद्या, शरीरयष्ठी कमवावी तरच आपल्याही गावातील अनेक तरुण देशसेवे साठी सैन्यात भरती होतील.
या कार्यक्रमास गावच्या प्रथम नागरीक लोकनियुक्त आदर्श सरपंच सौ.गायत्री महेश कुलकर्णी , मा. सरपंच महेश कुलकर्णी, शाळा व्यवस्थान समिती अध्यक्ष सुभाष गरदडे उपाध्यक्ष अतुल पाटील, ग्रा.पं सदस्य नारायण मोरे ,मेजर शहाजी चव्हाण, श्रीमती वैशाली निकत, ग्रा.पं कर्मचारी मामु खरात, उमेश धारेकर , विविध आजी-माजी पदाधिकारी बहुसंख्य ग्रामस्थ माता भगिनी व शालेय शिक्षक शिक्षिका, अंगणवाडी सेविका, मदतनिस व सर्व शालेय विद्यार्थी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना निकालपत्रक व खाऊचे वाटप करण्यात आले तसेच ग्रामपंचायत कडून शाळेसाठी 15 वा वित्त आयोग निधीतुन खेळाचे साहीत्य देण्यात आले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन जाधव सर यांनी केले.
Comment here