करमाळा

महापुरुषांचा इतिहास समाज जोडण्यासाठी असतो तोडण्यासाठी नाही ! इतिहासतज्ञ डॉ.श्रीमंत कोकाटे यांचे मांजरगाव येथे प्रतिपादन

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

महापुरुषांचा इतिहास समाज जोडण्यासाठी असतो तोडण्यासाठी नाही ! इतिहासतज्ञ डॉ.श्रीमंत कोकाटे यांचे मांजरगाव येथे प्रतिपादन

केतूर (अभय माने) – गौतम बुद्ध आणि संभाजीराजे हे आदर्श आणि महान राजांचे राजपुत्र होते असे कर्तुत्ववान राजे पुन्हा होणे नाही, गौतम बुद्ध यांनी अडीच हजार वर्षापुर्वी स्त्री ही पुरुषांच्या बरोबरीने वंश पुढे घेऊन जाते असे सांगितले होते.

तसेच क्षात्रवीर संभाजी राजे हे नितिमूल्य जपणारे, सुसंस्कृत स्त्रियांचा आदर व सन्मान करणारे, प्राच्यविद्या पंडित, संस्कृत भाषेवर प्रभुत्व असणारे कर्तुत्ववान राजे होते असे डॉ.प्रा. श्रीमंत कोकाटे यांनी आपल्या परखड व प्रभावी व्याख्यानातून समाजप्रबोधन केले.

मांजरगांव ता करमाळा येथे जगद्गुरु तुकोबाराय सार्वजनिक वाचनालय व नागलोक बुद्ध विहार तर्फे गौतम बौद्ध व क्षात्रवीर संभाजी राजे यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी राष्ट्रिय मुस्लिम मोर्चाचे कय्यूम शेख छत्रपती क्रांती सेनेचे प्रदेशअध्यक्ष,आर आर पाटील यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे पाटील रिपाईचे नागेश कांबळे मकाईचे संचालक संतोष पाटील उपस्थित होते यावेळी पुढे बोलताना प्रा कोकाटे म्हणाले की,चित्रातून चरित्र घडतं आणि चरित्रवानाचं चरित्र लिहलं जातं.

त्यामुळे लहान मुलांना नेहमी चांगली चित्र,आणि चरित्र ऐकवली पाहिजेत तरच पुढची पिढी चरित्रसंपन्न, सुसंस्कृत,होईल. त्याचबरोबर महापुरुषांचा इतिहास समाज जोडण्यासाठी असतो जातीजातीमध्ये तेढ निर्माण करण्यासाठी नसतो कोणत्याही जातीच्या माणसाचं रक्त एकसारखं आसतं मात्र जाती जातीमध्ये भांडण लावून राजकीय पोळी भाजण्याचं षडयंत्र काहीजण करत असतात.

यावेळी प्रास्तविकांमध्ये संत सहित्याचे अभ्यासक डॉ.प्रा. संजय चौधरी म्हणाले की क्षात्रवीर संभाजीराजांना धर्मामध्ये गुंतवून ठेवू नका ते इतके लहान नव्हते, तर ते खुप महान राजपुत्र होते,त्याचबरोबर गौतम बुद्धाचं नातं हे जातीशी नसून मातीशी होतं हे प्रथम ध्यानात घेतलं पाहिजे, यावेळी नितिन खटके प्रा नागेश माने सुहास पोळ प्रमोद बदे अतुल वारे अमित घोगरे

अमोल दुरंदे स्वप्निल गोडगे रेवन्नाथ निकत अजित कणसे संतोष शितोळे राजाभाऊ कदम बापूराव चोरमले लक्ष्मण भोसले यशवंत गायकवाड तानाजी झोळ दादासाहेब कोकरे संभाजी रिटे व परिसरातील बहुसंख्य महिला व पुरुष उपस्थित होते

litsbros

Comment here