करमाळाराजकारणसोलापूर जिल्हा

मांगीत बागल-पाटील युती असताना बागल गटाचा दारुण पराभव; मांगी सोसायटीत आ.संजय मामा शिंदे गटाचा दणदणीत विजय; वाचा सविस्तर विजयी उमेदवार आकडेवारीसह

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

मांगीत बागल-पाटील युती असताना बागल गटाचा दारुण पराभव; मांगी सोसायटीत आ.संजय मामा शिंदे गटाचा दणदणीत विजय; वाचा सविस्तर विजयी उमेदवार आकडेवारीसह

करमाळा (प्रतिनिधी) माजी मंत्री स्वर्गीय दिगंबरराव बागल यांच्या गावातीलच मांगी विविध कार्यकारी सोसायटीचे निवडणुकीत आमदार संजय मामा शिंदे गटाने सुजित तात्या बागल यांच्या नेतृत्वाखाली पॅनल 13 पैकी अकरा जागा जिंकत बागल गटाला त्यांच्या राहत्या गावातच जबरदस्त धक्का दिला आहे.

मांगी सोसायटीची निवडणूक खुद्द माजी आमदार शामलताई बागल यांनी प्रतिष्ठेची केली होती त्यांनी या निवडणुकीसाठी स्वतः उमेदवारी अर्ज भरला होता मात्र ब्रह्मदेव माने सहकारी बँकेचे थकबाकीचे ऑब्जेक्शन घेऊन सुजित बागल यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज बाद केला होता.

सुजित बागल यांच्याकडे जयवंत मल्टीस्टेट ची बाकी आहे असे सांगत त्यांच्या अर्जावर आक्षेप बागल गटाकडून घेण्यात आला होता मात्र यावेळी सुजित बागल यांनी एकरकमी कर्जफेड करून आपला अर्ज मंजूर करून घेतला होता

या निवडणुकीत बागल यांच्या गटाला नारायण पाटील गटाचे समर्थक देवानंद बागल यांनी बागल गटाला पाठिंबा दिला होता.

नारायण पाटील गट व बागल गट एकत्र असताना आमदार संजय मामा शिंदे गटाने दोघांनाही धोबीपछाड देत तेरापैकी 11 जागा जिंकून एक हाती संस्था ताब्यात घेतली आहे

या मांगी सोसायटी मधूनच बागल गटाचे जिल्हा बँकेसाठी उमेदवारी अर्ज जात असतो मात्र तेथेच त्यांना ब्रेक लावण्याचे काम आमदार संजय शिंदे यांनी केले आहे.

हा तर कामाचा विजय – सुजित बागल!

आमदार संजय मामा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत चांगल्या पद्धतीने मांगी गावात काम चालू असून प्रत्येक गावकरी कष्टकऱ्यांच्या समस्या सोडवल्या जात आहेत सोसायटीच्या माध्यमातून कोणतेही राजकारण न करता चांगल्या पद्धतीने काम केल्यामुळे मांगी तील जनतेने आमदार संजय मामा शिंदे यांच्यावर विश्वास ठेवत आमच्या पॅनलला निवडून दिले उसाचा गंभीर प्रश्न आमदार संजय मामा शिंदे यांनी सोडविला आहे. असे मत सुजित बागल यांनी करमाळा माढा न्यूजशी बोलताना व्यक्त केले.

या निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते . दस्तरखुद्द माजी आमदार शामलताई बागल यांचा स्वतःचा उमेदवारी अर्ज देखील बाद झाला होता . एकुण ४१७ पैकी ३८४ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला . विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते राजेंद्र बागल ( १९२ ), दिवाण बागल ( १९२ ), संभाजी बागल (१९० ), सुजीत बागल ( १९९ ), वैभव बागल ( १८८ ), विठ्ठल बागल ( १७६ ) दिलीप बागल( १७३ ), उमेश बागल ( २०४ ), अश्विनी बागल ( २१० ), प्राची नलवडे ( १८७ ), मंगल खरात ( १९४ ) ,सुजीत बागल ( २११ ), अभिमान अवचर ( १९९ ) यांचा समावेश आहे.

सर्व विजयी उमेदवारांचे आमदार संजयमामा शिंदे, माजी आमदार जयवंतराव जगताप , करमाळ्याचे नगराध्यक्ष वैभव जगताप, युवानेते शंभुराजे जगताप यांनी अभिनंदन केले आहे . निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून सौ .एस .के . मुंढे यांनी काम पाहीले.

litsbros

Comment here