करमाळाक्राइम

करमाळा शहरातील नागरिकाचा प्रामाणिकपणा; सापडलेले रोख दोन लाख रुपये केले पोलिसांच्या स्वाधीन

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा शहरातील नागरिकाचा प्रामाणिकपणा; सापडलेले रोख दोन लाख रुपये केले पोलिसांच्या स्वाधीन

करमाळा (प्रतिनिधी) ;  सध्या पोलिस म्हटले की समाजाच्या बघण्याचा दृष्टिकोन वेगळाच असतो मात्र करमाळा पोलिसांनी चक्क प्रमाणिकपणा दाखवीत चक्क दोन लाख रुपये परत केल्याची घटना करमाळ्यात घडली आहे राजेश नारायण तालापल्ली रा परांडा जिल्हा उस्मानाबाद यांचे हरवलेले दोन लाख रुपये पोलिसांच्या व करमाळा शहरातील सुज्ञ नागरिकांमुळे व तत्परतेमुळे परत मिळाले.

तालापल्ली यांची बॅग हरवली तेव्हा त्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार केली तेव्हा करमाळा पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे साहेब यांच्या आदेशाने तात्काळ करमाळा पोलीस स्टेशनचे पोलीस हेडकॉन्स्टेबल संतोष देवकर

पोलीस नाईक चंद्रकांत ढवळे पोलीस कॉन्स्टेबल तोफिक काझी पो कॉ सोमनाथ जगताप पो कॉ गणेश खोटे यांनी तात्काळ तपास केला असता सुनील रामचंद्र मारडकर (राहणार फंड गल्ली) करमाळा यांनी पैसे सापडले असल्याचे सांगितले.

त्यापैकी सापडलेल्या रोकड मधील दहा हजार रुपये मारडकर यांना बक्षीस म्हणून दिले करमाळा शहरातील फंड गल्ली येथील सुज्ञ नागरिक यांनी वेळीच प्रामाणिकपणा दाखून करमाळा पोलिसांच्या मदतीमुळे सदरची रक्कम तालापल्ली राहणार परांडा यांना परत केली

litsbros

Comment here