श्री मकाई सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत झाले ‘इतके’ टक्के मतदान; सर्वाधिक मतदान मांगीत, आता मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष..
करमाळा (प्रतिनिधी): मकाई सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आज मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली सर्वाधिक मतदान मांगी येथे तर सर्वात कमी मतदानाची टक्केवारी चिकलठाण येथे नोंदवण्यात आली आहे तरी एकूण मतदान 56.93% मतदान नोंदविण्यात आली आहे .
मकाई सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सकाळी आठ वाजता मतदानाला सुरुवात झाली यावेळी मतपेटीचे पूजन करून पुढील मतप्रक्रियेला सुरुवात करण्यात आली तालुक्यातील 41 केंद्रावर आज मतदान शांतते मय पद्धतीने पार पडले.
भिलारवाडी गटात 55.72% मतदान पारेवाडी गटात 59, 69 टक्के मतदान चिकलठाण गटात 44.57% मतदान वांगी गटात 57.27% मतदान तर मांगी येथे 66.63% मतदान झाले आहे. सदरची मतमोजणी दिनांक 18 रोजी सकाळी आठ वाजल्यापासून हे चव्हाण बहुउद्देशीय सभागृह चव्हाण कॉलेज येथे होणार आहे.
सदर मकाई सहकारी साखर कारखान्याचे निवडणुकीमध्ये बागल गटाचे युवा नेते दिग्विजय बागल तसेच मकाई परिवर्तन पॅनेलचे प्राध्यापक रामदास झोळ यां दोघांनी विजयाचे दावे केले आहे.