करमाळाशैक्षणिकसोलापूर जिल्हा

करमाळयातील महात्मा गांधी विद्यालयाचे सन 1986 च्या बॅचचे मित्रमैत्रिणी यांचा स्नेहमेळावा होणार खडकवासला येथे; अध्यक्ष डॉ.सुजित शिंदे यांची माहिती

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळयातील महात्मा गांधी विद्यालयाचे सन 1986 च्या बॅचचे मित्रमैत्रिणी यांचा स्नेहमेळावा होणार खडकवासला येथे; अध्यक्ष डॉ.सुजित शिंदे यांची माहिती

करमाळा (प्रतिनिधी) ; महात्मा गांधी विद्यालय येथील सन 1986 मधील इयत्ता दहावी च्या सर्व तुकड्यातील माजी विद्यार्थ्यांचा भव्य मेळावा अर्थात स्नेह संमेलन दिनांक 26 व 27 फेब्रुवारी रोजी खडकवासला येथील रिसॉर्ट हॉटेलमध्ये भव्य स्वरूपात सदर चा मेळावा आयोजित केली असल्याची माहिती संयोजन समितीचे अध्यक्ष डॉक्टर सुजित शिंदे तसेच उपाध्यक्ष विद्या कांबळे मस्तूद यांनी दिली आहे.

याबाबतची अधिक माहिती देताना विद्या कांबळे म्हणाल्या की करमाळा येथील महात्मा गांधी विद्यालयात सन 1986 या वर्षात शिक्षित झालेल्या तसेच वर्गातील सर्व माजी विद्यार्थ्यांचा पुणे जिल्ह्यातील खडकवासला येथील रिसॉर्ट हॉटेलमध्ये भव्य मेळाव्याचे आयोजन सुमारे 36 वर्षानंतर करण्यात आल्याचे त्यांनी बोलताना सांगितले.

या वेळी जुन्या आठवणींना उजाळा तसेच इयत्ता दहावी मधील आज पर्यंतच्या आलेल्या विविध आठवणी तसेच जुन्या मित्र-मैत्रिणींचे यावेळी गाठीभेटी होणार असून सदर स्नेह मेळाव्यामध्ये अधिकाअधिक माजी विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.

हेही वाचा – लाईट रात्रीचीच होती! रात्री ऊसाला पाणी देताना तीस वर्षीय तरुणाचा साप चावून मृत्यू; गावावर शोककळा; हृदयद्रावक घटना

खळबळजनक : एकाच कुटुंबातील पाच जणांचा विष प्राशन करून सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न

महात्मा गांधी विद्यालयातील आजी-माजी विद्यार्थ्यांचा सुमारे 36 वर्षानंतर एकत्रित येण्याचा हा दुग्धशर्करा योग असून यावेळी माजी विद्यार्थ्यांनीयांनी पुणे येथील मेळाव्यासाठी जाण्याकरिता जोरदार जय्यत तयारी केली आहे अशी माहिती शेवटी संयोजन समितीचे कार्याध्यक्ष एडवोकेट अजय दिवाण यांनी दिली.

litsbros

Comment here