क्राइममाढासोलापूर जिल्हा

टेंभुर्णीतील रस्ते वाहतुकीसाठी की विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टरच्या पार्किंगसाठी.? जनशक्तीचा सवाल

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

टेंभुर्णीतील रस्ते वाहतुकीसाठी की विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टरच्या पार्किंगसाठी.? जनशक्तीचा सवाल

करमाळा(प्रतिनिधी) ; माढा तालुक्यातील टेंभुर्णी शहर नव्यानेच विस्तारित होत आहे शिवाय शहरालगत असलेल्या औद्योगिक वसाहतीमुळे टेंभुर्णी नावारूपाला येत आहे. या औद्योगिक वसाहतीमध्ये वेगवेगळ्या व्यवसायांच्या जवळपास 300 कंपन्या आहेत.

या कंपन्यांमधून दळणवळणाची सोईसुविधा व्यवस्थित व्हावी म्हणून चांगल्या रस्त्याची सोय केली आहे. मात्र हेच रस्ते औद्योगिक वसाहतीसाठी आहेत की विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टरच्या पार्किंग साठी आहेत असा प्रश्न निर्माण झाला आहे.

याबाबत औद्योगिक वसाहत अधिकारी भगत यांच्याशी संपर्क साधला. मात्र त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली आहेत. त्यामुळे हे रस्ते तात्काळ मोकळे करा अन्यथा जनशक्ती संघटना रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा प्रदेशाध्यक्ष अतुल खूपसे पाटील यांनी दिला.

 पुढे बोलताना खूपसे पाटील म्हणाले की, टेंभुर्णी शहरालगत असलेल्या औद्योगिक वसाहतीसाठी वेगवेगळ्या निधीमधून अथवा खाजगीरित्या रस्त्यांची निर्मिती केली आहे.

मात्र हे रस्ते आता विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे उसाने भरलेले ट्रॅक्टर पार्किंग साठी वापरण्यात येऊ लागले आहेत. वास्तविक पाहता औद्योगिक वसाहतीमध्ये अशाप्रकारे ओव्हरलोड वाहने लावून अथवा रहदारीस अडथळा निर्माण करून एक प्रकारे औद्योगिक वसाहती चे नुकसान होत आहे.

एकीकडे माढा व करमाळा तालुक्याचे आमदार शिंदे बंधू विकासाच्या गप्पा मारतात, मात्र दुसरीकडे स्वतःच्या प्रपंचासाठी तालुक्यातील शासकीय व निमशासकीय मालमत्तांचा वापर करतात असा घणाघात करून ओव्हरलोड भरलेल्या उसाच्या वाहनांमुळे औद्योगिक वसाहतीमधील रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे,

रस्ते सर्वत्र उखडले आहेत, लाईटचे पोल वाकडेतिकडे झाले आहेत. या सर्व बाबींकडे तालुका प्रशासन मात्र जाणीवपूर्वक डोळेझाक करत आहे. असा आरोप अतुल खुपसे यांनी केला आहे.

हेही वाचा- धक्कादायक : कौटुंबिक वादातून हत्या-आत्महत्या; नणंद-भावजयीचा मृत्यू, भावाने केले विष प्राशन

करमाळा तालुक्यातील ‘या’ चौदा गावच्या ग्रामपंचायतीत होणार पोटनिवडणुका; क्लिक करून वाचा, मतदान व निकालाच्या तारखा

याठिकाणी सामान्य शेतकऱ्यांची वाहने उभी राहिली असती आणि रहदारीस अडथळा निर्माण झाला असता तर पोलिस प्रशासनाने कारवाईचे हत्यार उपसले असते.

 त्यामुळे पोलिस बांधवांना विनंती आहे की, संबंधित कारखान्याला वाहनाच्या पार्किंगची सोय करण्याची नोटीस द्यावी, औद्योगिक वसाहत अधिकारी भगत यांनी याबाबत ठोस पाऊल उचलावे अन्यथा जनशक्ती संघटना रस्त्यावर उतरेल असा इशारा त्यांनी दिला.

litsbros

Comment here