करमाळावांगीसोलापूर जिल्हा

करमाळा तालुक्यातील ‘या’ चोवीस वर्षीय तरुणाचा हार्ट अटॅक ने मृत्यू

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा तालुक्यातील ‘या’ चोवीस वर्षीय तरुणाचा हार्ट अटॅक ने मृत्यू

करमाळा(प्रतिनिधी) ; सध्या बदलत्या जीवनशैली मुळे तरुणाईत हार्ट अटॅक येण्याचे प्रमाण वाढले आहे. व्यायाम करणारी, शिकणारी तरुणीबांड तरुण मुले सहज जात आहेत. असाच दुःखद प्रकार करमाळा तालुक्यातील वांगी नं.२ येथे घडला आहे.

करमाळा तालुक्यातील वांगी नं 2 येथील येथील सतीश विलास जाधव या चोवीस वर्षीय तरुणाचे नुकतेच हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने वांगी येथे निधन झाले आहे.

हेही वाचा- पृथ्वीराज पाटील यांच्यावर दाखल झालेला गुन्हा राजकीय द्वेषातुन?

वृद्ध दाम्पत्याची विष पिऊन आत्महत्या, शेतात झाडाखाली आढळले मृतदेह: सोलापूर जिल्ह्यातील घटना

सतीश जाधव हा उच्चशिक्षित अविवाहित तरुण होता. तो स्पर्धा परीक्षा अभ्यास करत होता. तसेच तो पदवीधर झालेला एक हुशार तरुण होता. खूप मोठी स्वप्न घेऊन स्पर्धापरीक्षा करणारा तो एक सर्वसामान्य कुटुंबातील मुलगा होता.

त्याच्या अशा अचानक जाण्याने सर्वानाच धक्का बसला आहे. त्याच्या मागे घरात आई वडील व धाकटा भाऊ असा परिवार आहे.

अतिशय प्रतिकुल परिस्थितीतून शासनाच्या सेवेत जाण्याचे त्याचे स्वप्नं होते. अचानक राहत्या घरी त्याला हृदयविकाराचा धक्का बसला व खाली पडला. त्यातच त्याचे निधन झाले. त्याच्या मागे एक भाऊ, आई-वडील असा परिवार आहे. सतीश जाधव हा अविवाहित होता.

litsbros

Comment here