आरोग्यकरमाळाताज्या घडामोडीसोलापूर जिल्हा

‘करमाळा माढा न्यूज’च्या बातमीचा दणका: दुसऱ्याच दिवशी कर्मचारी गायीला शोधत सुतार गल्लीत दाखल.. नागरिकांनी मानले ‘करमाळा माढा न्यूज’चे आभार 

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा माढा न्यूज च्या बातमीचा दणका: दुसऱ्याच दिवशी कर्मचारी गायीला शोधत सुतार गल्लीत दाखल.. नागरिकांनी मानले ‘करमाळा माढा न्यूज’चे आभार

करमाळा(प्रतिनिधी) ; करमाळा शहरात अनेक मोकाट जनावरे हिंडत आहेत. तशीच एक मोकाट गाय सुतार गल्लीतील घराघरात घुसत होती, तसेच बलराज परदेशी यांच्या घरात घुसून नंतर त्या गाईने त्यांच्या कारखान्यात ठाण मांडले.

त्या गाईला लंपी आजाराचे लसीकरण झालेले नव्हते. तिला लंपीची लक्षणे दिसत होती. त्याबद्दल परदेशी यांनी करमाळा नगरपालिका व पशुवैद्यकीय डॉक्टरांना संपर्क केला व लसीकरण करण्याची विनंती केली पण डॉक्टरांनी ‘गाय इथे घेऊन या, आम्ही तिकडे येणार नाही’ असे उत्तर त्यांना दिले.

त्याबाबतचे वृत्त ‘करमाळा माढा न्यूज’ मध्ये प्रसिद्ध करण्यात आले. करमाळा माढा न्यूज मध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर यंत्रणा हलली व दुसऱ्याच दिवशी करमाळा नगरपालिका कर्मचारी गाईला हुडकत सुतार गल्लीत पोहोचले व गाय कुठे आहे? आम्ही लसीकरण करण्यासाठी आलो आहोत. असे त्यांनी परदेशी यांना सांगितले पण रात्री अंधारात ती गाय तिथून कोठे कोठे निघून गेली होती. पुन्हा परदेशी यांनी ती गाय त्या कर्मचाऱ्यांना शोधून दिली.

करमाळा माढा न्युज ने दिलेली बातमी👇

करमाळा शहर सुतार गल्लीत मोकाट गायचा उपद्रव; प्रशासनाचे दुर्लक्ष, लस देणारे डॉक्टर म्हणतात, ‘गायला दवाखान्यात आणा’

करमाळा शहरात फिरणाऱ्या अशा अनेक मोकाट जनावरांना वेळीच लम्पी आजाराचे लसीकरण करणे गरजेचे आहे. करमाळकरांच्या, शहरवासी यांचे आरोग्याच्या दृष्टीने ते अतिशय महत्त्वाच आहे डॉक्टर व कर्मचारी यांनी हलगर्जीपणा न करता वेळीच लसीकरण करावे.

गायीच्या लसीकरणासाठी न जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना मात्र ‘करमाळा माढा न्यूज’च्या बातमीनंतर तातडीने गाईला शोधत सुतार गल्लीत जावे लागल्याने सुतार गल्लीतील अनेक नागरिकांनी करमाळा माढा न्यूज चे आभार व्यक्त केले.

तसेच संवेदनशील व्यक्तिमत्व नागरिक बलराज परदेशी यांनी करमाळा माढा न्यूज चे विशेष आभार मानले.

आपल्या बातमीचा इफेक्ट झाला सर आणि आज सकाळी करमाळा नगर परिषदेचे दोन कर्मचारी आले. पण गाय तिथे नसल्यामुळे त्यांना गाय हुडकून दिली. यात तुमचेही आभार मानतो आणि करमाळा नगरपरिषदेचेही आभार मानतो. परंतु कमीत कमी काल मी शहरात फिरल्यानंतर माझ्या बघण्यात असे दिसून आले 40% मोकाट गाया आहेत. त्यांना लंपी आजार लक्षणे दिसत आहेत.
– बलराज परदेशी, नागरिक, सुतार गल्ली करमाळा

litsbros

Comment here