करमाळाताज्या घडामोडीसोलापूर जिल्हा

करमाळा माढा न्यूज च्या वृत्ताची दखल घेत अखेर करमाळा बस स्थानकातील महिला स्वच्छतागृह झाले सुरू

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा माढा न्यूज च्या वृत्ताची दखल घेत अखेर करमाळा बस स्थानकातील महिला स्वच्छतागृह झाले सुरू

करमाळा (प्रतिनिधी) : करमाळा बस स्थानका मधील महिला स्वच्छतागृहाबाबत सोलापूर जिल्हा शांतता समितीचे सदस्य तसेच ऑल इंडिया ह्यूमन राइट चे तालुका अध्यक्ष आयुब शेख यांनी याबाबत सोलापूर जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती.

करमाळा बस स्थानकामधील महिला स्वच्छतागृह बंद असल्याचे लेखी निवेदन जिल्हाधिकारी यांच्याकडे ई-मेलच्या माध्यमातून पाठवले होते. याशिवाय शेख यांनी सोलापूर जिल्हा आगार व्यवस्थापकाकडे देखील तक्रार केली होती.

करमाळा माढा न्युज ने प्रकाशित केलेली हीच ती बातमी👇 क्लिक करून वाचा सविस्तर 

महिला सन्मान? महिलांना न्याय.? करमाळा बस स्थानकात तर होतोय महिलांना त्रास! महिला स्वच्छतागृहाला लावले कुलूप, महिलांचे प्रचंड हाल ; महिलांच्या या व्यथा कोणाला कळतील का?

याबाबतचे वृत्त सर्वप्रथम करमाळा माढा न्युज पोर्टल द्वारे मीडियाच्या माध्यमातून आले होते. या वृत्ताची दखल घेत अखेर वरिष्ठ पातळीवरून त्वरित हालचाल होऊन अखेर करमाळा बस स्थानकामधील महिला स्वच्छतागृह चालू झाले आहे.

याबाबत शेख यांनी व अनेक महिला भगिनींनी करमाळा माढा न्यूज पोर्टल चे विशेष आभार व्यक्त केले.

litsbros

Comment here