करमाळाजेऊर

जेऊर येथील भारत महाविद्यालयांमध्ये लसीकरण शिबिराचे उद्घाटन 

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

जेऊर येथील भारत महाविद्यालयांमध्ये लसीकरण शिबिराचे उद्घाटन

करमाळा(प्रतिनिधी) ; महाराष्ट्र शासनाच्या युवा स्वास्थ कोविड लसीकरण मोहिमेअंतर्गत भारत महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग, अंतर्गत गुणवत्ता सुधार कक्ष व प्राथमिक आरोग्य केंद्र जेऊर यांच्या संयुक्त विद्यमाने आज बुधवार दिनांक 27 ऑक्टोबर रोजी भारत महाविद्यालयांमध्ये कोविड लसीकरणाच्या जम्बो शिबिराचे उद्घाटन भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे नूतन संचालक पृथ्वीराज नारायण पाटील यांचे हस्ते करण्यात आले.

या शिबिरामध्ये कोव्हॅक्सीन आणि कोविशिल्ड अशा दोन्ही प्रकारच्या लसीचे डोस नागरिकांना देण्यात येत असून लसीकरणासाठी ऑनलाइन नाव नोंदणी केलेली नाही अशा नागरिकांनाही या शिबिरामध्ये लस दिली जात आहे.

हे शिबिर सकाळी नऊ ते दुपारी एक वाजेपर्यंत बुधवार आणि गुरुवार असे दोन दिवस सुरू राहणार असून या शिबिराचा लाभ विद्यार्थी आणि नागरिक यांनी घ्यावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अनंत शिंगाडे यांनी केले आहे.

litsbros

Comment here