करमाळासोलापूर जिल्हा

दिग्विजय बागल यांचे करमाळा बाजार समितीचे सदस्यत्व अपात्रच; बागल गटाला धक्का, जगताप गटात आनंदोत्सव; वाचा सविस्तर

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

दिग्विजय बागल यांचे करमाळा बाजार समितीचे सदस्यत्व अपात्रच; बागल गटाला धक्का, जगताप गटात आनंदोत्सव; वाचा सविस्तर

करमाळा(प्रतिनिधी) ; दिग्विजय बागल यांचे करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्यत्व शंभुराजे जयवंतराव जगताप यांनी केलेल्या अर्जानुसार पणन संचालक पुणे यांनी रद्द करत बागल यांना अपात्र ठरविले होते. यावर बागल यांनी सुरुवातीला उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते.

उच्च न्यायालयाने त्यांचे अपील फेटाळत कायद्यातील तरतुदीनुसार राज्य सरकारकडे अपील करणेबाबत आदेश दिले होते. त्यावेळी बागल यांनी राज्य शासनाकडे अपील दाखल केलेनंतर तब्बल १ वर्षानंतर त्यांना स्थगिती मिळाली होती त्यानंतर कोरोना काळामुळे त्यांना सदस्यपदी राहता आले होते.

परंतु अखेर नैसर्गिक न्याय तत्वानुसार वादी व प्रतिवादी यांनी आपले म्हणणे मांडून गुणवत्तेवर निर्णय देणेसाठी स्थगिती आदेश उठविणे आवश्यक असलेची शासनाची खात्री झालेने सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिलेला स्थगिती आदेश रद्द करत असलेबाबतचे आदेश पारीत केले.

या आदेशामुळे बागल गटाला जबरदस्त धक्का बसला आहे. यामुळे जगताप गटाची बाजार समिती वरील पकड अधिक मजबूत झाली आहे. आता पुढे बागल नेमकी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.

litsbros

Comment here