करमाळामाणुसकीसोलापूर जिल्हा

करमाळयातील या लॉन्ड्री चालकाचा प्रामाणिकपणा; एक तोळयाचे सोन्याचे लॉकेट केले ग्राहकाला परत; पोलिसांनी केला सत्कार

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळयातील या लॉन्ड्री चालकाचा प्रामाणिकपणा; एक तोळयाचे सोन्याचे लॉकेट केले ग्राहकाला परत; पोलिसांनी केला सत्कार

करमाळा(प्रतिनिधी); येथील गजराज लॉन्ड्रीचे मालक रावसाहेब गणपत सावरे यांचा पुन्हा एकदा सत्कार करण्यात आला आहे. हा सत्कार तालुक्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी सुर्यकांत कोकणे यांचे हस्ते करण्यात आला आहे.

येथील व्यापारी प्रदीप बलदोटा यांचे कपडे गजराज लॉन्ड्री मध्ये ड्रायक्लीनसाठी टाकण्यात आले होते. सावरे यांनी नेहमीप्रमाणे कपडे मशीनमध्ये घालण्यापूर्वी चेक केले असता, त्यांना त्यामध्ये एक तोळ्याचे सोन्याचे लॉकेट सापडले. त्यांनी ताबडतोब बलदोटा यांना तुमच्या कपड्यात सोन्याची एक तोळ्याची चैन आली आहे, असे सांगितले. त्यानंतर बलदोटा यांनी ती चैन तुमच्याजवळच राहू द्या नंतर घेऊ असे सांगितले.

सायंकाळी सात वाजता सावरे यांना पोलीस कार्यालयातून फोन आला व तुम्हाला कोकणे सो यांनी ताबडतोब बोलविल्याचे सांगितले. तिथे गेल्यानंतर पोलीस निरीक्षक सुर्यकांत कोकणे, व्यापारी प्रदीप बलदोटा व अन्य पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

त्यावेळी कोकणे यांनी सावरे यांचा फेटा बांधून शाल, श्रीफळ व बंद पाकीट देऊन सत्कार केला व आपल्यासारख्या प्रामाणिक माणसामुळे करमाळ्याचे नांव उज्वल होत आहे.

अशाचप्रकारे आपली सेवा चालू राहू द्या असे सांगितले. यावेळी बलदोटा यांनी सावरे तसेच कोकणे यांचे आभार मानले.

litsbros

Comment here