करमाळा येथील लोकन्यायालयात एकूण 116 खटले तडजोडीने निकाली; तर बँकांच्या ‘इतक्या’ कोटींची वसुली
करमाळा (प्रतिनिधी); करमाळा येथील दिवाणी न्यायालयामध्ये आयोजित केलेल्या लोक आदालत मध्ये एकूण 116 खटले तडजोडीने निकाली काढण्यात आले. तर बँकांचे रक्कम रुपये दोन कोटी 49 लाख 87 हजार 985 रुपयांची वसुली करण्यात आली.
या लोकन्यायालयाचे आयोजन करमाळा येथील न्यायालयामध्ये करण्यात आलेले होते। या लोकन्यायालयाचा शुभारंभ या न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश सौ. मीना प्रकाश एखे यांचे हस्ते करण्यात आले.
यावेळी सह दिवाणी न्यायाधीश राजू शिवरात्रि तसेच वकील संघाचे अध्यक्ष एडवोकेट श्री विकास जरांडे उपाध्यक्ष प्रमोद जाधव तसेच सचिव योगेश शिंपी व वकील संघाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या लोक न्यायालय मध्ये दिवाणी व फौजदारी प्रलंबित प्रकरणांपैकी 48 प्रकरणे तडजोडीने मिटवण्यात आली.
यामध्ये एकूण 30 लाख 6 हजार 701 रुपयांची वसुली करण्यात आली.
तर दाखल पूर्व प्रकरणांपैकी एकूण 68 प्रकरणे निकाली निघून दोन कोटी 49 लाख 87 हजार 985 रुपयांची वसुली करण्यात आली
Comment here