आरोग्यकरमाळा

बापरे! करमाळा तालुक्यात लम्पी स्कीन आजाराने आजवर ‘इतक्या’ जनावरांचा झाला मृत्यू; प्रशासनाची माहिती..

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

बापरे! करमाळा तालुक्यात लम्पी स्कीन आजाराने आजवर ‘इतक्या’ जनावरांचा झाला मृत्यू; प्रशासनाची माहिती..

केत्तूर (अभय माने) संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात लम्पी स्कीन आजाराने 582 जनावरांचा मृत्यू झाला आहे .आत्तापर्यंत सर्वाधिक मृत्यू माळशिरस तालुक्यात 199 जनावरे मृत झाली असून, त्या खालोखाल करमाळा तालुक्यातील 168 जनावरांचा समावेश आहे.

करमाळा तालुक्यात सप्टेंबर महिन्यापासून जनावरांना लंपी स्किनचा प्रादुर्भाव होण्यास सुरुवात झाली होती सुरुवातीला एक दोन असणारी बाधित जनावरांची संख्या पुढे पुढे वाढत गेली. यावर तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे.

सोलापूर जिल्ह्यात 745324 गाय वर्ग जनावरे असून
बाधित गावांची गावांची संख्या – 758
बाधित पशुधन – 10358
बरे झालेले पशुधन – 4058
मृत पशुधन – 582
सध्या बाधित असणारे पशुधन – 5718
सध्या अत्यवस्थ असणारे पशुधन – 293

करमाळा तालुक्यातील बाधित जनावरे असणारे ईपी सेंटर ची नावे पुढीलप्रमाणे वीट राजुरी सावडी, केडगाव, भिलारवाडी, भाळवणी, करमाळा, हिसरे, केम, गुळसडी, बोरगाव, उत्तर वडगाव करंजे साडे हिंगणी गौंडरे व झरे.

“करमाळा तालुक्यात जवळपास सर्व जनावरांना लसीकरण झाले आहे काही ठिकाणी वासरांची लसीकरणही झाले आहे राहिलेल्या वासरांची लसीकरण पूर्ण करणार आहोत त्यासाठी पशुपालकांनी सहकार्य करणे महत्त्वाचे व गरजेचे आहे.
– डॉ.प्रवीण शिंदे, पशुविकास अधिकारी, करमाळा

 

litsbros

Comment here