करमाळामहाराष्ट्रराष्ट्रीय घडामोडी

करमाळयाच्या ‘या’ सुपुत्राने सर केले हिमालयातील शिखर; सर्वत्र होतेय कौतुक

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळयाच्या ‘या’ सुपुत्राने सर केले हिमालयातील शिखर; सर्वत्र होतेय कौतुक

करमाळा( प्रतिनिधी )करमाळा तालुक्यातील मूळचे कोंढेज येथील व सध्या पुणे येथे पोलीस दलामध्ये कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे यांनी कोरोना योद्ध्यांना समर्पित म्हणून काँगयातसे शिखर मोहीम फत्ते केली आहे. हिमालयाच्या शिखरा पैकी असलेल्या सदरची शिखर मोहीम पोलीस उपनिरीक्षक ननवरे यांनी पूर्ण केल्याने त्यांचे विशेष कौतुक होत आहे.

लडाख मधील सहा हजार दोनशे पन्नास मीटर उंच असलेल्या शिखर मोहीम ही एव्हरेस्टवीर भगवान चावले यांच्या मार्गदर्शनाखाली ननवरे यांनी पार पाडली. या मोहिमेमध्ये एकूण 19 गिर्यारोहकांच्या समूहाने भाग घेतला होता.

हेही वाचा- पेट्रोल पंपावर या 10 सुविधा फ्री मध्ये मिळणे हा प्रत्येक ग्राहकाचा हक्क आहे; जर ‘या’ सुविधा मिळत नसतील तर पेट्रोल पंपाचे लायसन्स होऊ शकते रद्द

पत्नी माहेरी जाताच मुख्याध्यापकानं केल भलतच कांड; आरोपी मुख्याध्यापकासह कुटुंबाविरुद्ध गुन्हा दाखल

यापैकी ननवरे हे देखील एक होते सदरची मोहीम ही पुणे येथील दि अल्फालिस्ट गिर्यारोहण संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आली होती हिमालयीन वातावरण अतिशय थंड जे -18 इतके खाली असते अशा वातावरणात शारीरिक व मानसिक संतुलन टिकविणे अतिशय अवघड असते.

अशा ही कठीण परिस्थितीत ननावरे यांनी सदरची शिखर मोहीम पूर्ण केली आहे शिखर मोहीम पूर्ण केल्याबद्दल त्यांचे टायगर ग्रुपचे महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष तानाजी जाधव यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले आहे.

litsbros

Comment here