कुगाव येथील महिलेला अर्वाच्य भाषेत जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी एकावर अट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल
जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील कुगाव येथील रहिवासी असलेल्या कामगाराच्या कामाचे पैसे मागितल्या कारणाने एका वृध्द महिलेला भ्रमणध्वनीवरून अश्लील, अर्वाच्य जातीवाचक शिविगाळ केल्याप्रकरणी एकाजणा विरूध्द करमाळा पोलिस ठाण्यात अॅट्रासिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विशाल गरड पाटील (चिंचपुर ता.परांडा असे. गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. वृद्ध महिलेच्या मुलाचे संशयित आरोपीचा चुलत भाऊ नितिन गरड पाटील याच्याकडे कामाचे 26 हजार रूपये होते.तो वारंवार पैसे मागतो म्हणून नितिन याने आरोपी विशाल याला त्याचा मोबाईल नंबर देऊन दम द्यायला सांगितले होते.
यावेळी महिलेने फोन घेतल्यानंतर
त्याने अश्लील भाषेत व जातीवाचक शिव्या दिल्या त्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणाची माहिती वृध्द महिलेच्या मुलाने प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते उत्तरेश्वर कांबळे व कुगाव मधील सामाजिक कार्यकर्ते युवराज ओहोळ,यांना दिली होती.
हेही वाचा- ब्रेकिंग न्यूज- परवानगीविना मराठा मोर्चा काढल्याने 3000 जणांवर गुन्हा दाखल
‘शिवराज्याभिषेक’ दिनानिमित्त महाराजांच्या कार्याचा गौरव करणारा शगुफ्ता शेख यांचा विशेष लेख
कांबळे यांनी आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी केली असुन पुढील तपास उपविभागीय पोलीस आधिकारी डाॅ. विशाल हिरे करत आहेत.
Comment here