करमाळाक्राइमबार्शीसोलापूर जिल्हा

करमाळा पंचायत समितीतील ग्रामसेवक-सरपंच वादातील ‘त्या’ सरपंचपती शिक्षकास अटकपूर्व जामीन मंजूर

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करंजे येथील ग्रामसेवक-सरपंच वादातील ‘त्या’ सरपंचपती शिक्षकास अटकपूर्व जामीन मंजूर

उमरड (प्रतिनिधी) ग्रामसेवक अंगद बळीराम सरडे यांनी दिनांक 28/06/2021 रोजी सहशिक्षक राजेंद्र रूपचंद जाधव राहणार करंजे तालुका करमाळा यांचे विरोधात सरकारी कामात अडथळा करून मारहाण व शिवीगाळ केल्याबाबत फिर्याद करमाळा पोलीस स्टेशन येथे नोंदवली होती.

त्यांनी त्यांचे फिर्यादीत ते पंचायत समिती करमाळा येथील गट विकास अधिकारी यांचे कार्यालयात राजेंद्र जाधव यांनी त्यांना शिवीगाळ मारहाण करून सरकारी कामात अडथळा निर्माण केला, अशा आशयाची फिर्याद दाखल केली होती.

यातील फरार आरोपी राजेंद्र रूपचंद जाधव यांनी अटकपूर्व जामिनासाठी एडवोकेट निखिल पाटील यांचे मार्फत अतिरिक्त सत्र न्यायालय बार्शी येथे धाव घेतली होती. सदर जामीन अर्जाची सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश माननीय श्री एस बी बसणे यांच्यासमोर झाली.

सुनावणीवेळी आरोपीचे वकील एडवोकेट निखिल पाटील यांनी सदर आरोपी हा सहशिक्षक असून आरोपीचे पत्नीने यातील फिर्यादी विरुद्ध अनेक लेखी तक्रारी केल्या असून त्याचा राग मनात धरून सदरची खोटी बनावट केस दाखल केली आहे.

तसेच घटनेवेळी सदरील फिर्यादी हा कोणतेही सरकारी काम करत नव्हता व आरोपीने कुठल्याही सरकारी कामात अडथळा केलेला नाही, तसेच त्याची चौकशीकामी अटक करण्याची गरज नसल्याबाबत युक्तिवाद केला.

हेही वाचा- करमाळा येथील हॉटेलात वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या ‘त्या’ दोघांना बार्शी कोर्टात जामीन

उजनी मायनस 23 टक्क्यांवरून मायनस 5 टक्क्यांवर; उजनी धरण पाणलोट धरणसाखळीत 6529 मि. पावसाची नोंद

सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी राजेंद्र रूपचंद जाधव याची पंधरा हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर अटकपूर्व जामिनावर मुक्तता करण्यात आली.

सदर प्रकरणात आरोपीतर्फे एडवोकेट निखिल पाटील एडवोकेट विक्रम सातव तर सरकार तर्फे एडवोकेट पी ए बोचरे यांनी काम पाहिले.

litsbros

Comment here