करमाळा

कोर्टीचे राहुलकुमार चव्हाण यांना राज्यस्तरीय पुरस्कार

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

कोर्टीचे राहुलकुमार चव्हाण यांना राज्यस्तरीय पुरस्कार

पुणे; व्याख्याने व शैक्षणिक सेवेसोबतच सामाजिक क्षेत्रातही आपला उमटविणारे कोर्टी येथील रहिवासी राहुलकुमार चव्हाण यांना काल दिनांक 28 नोव्हेंबर रोजी महात्मा जोतीराव फुले यांचे स्मृतिदिनाच्या औचित्य साधून महात्मा फुले साहित्य अकादमी महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार शेतकरी संघटनेचे नेते मा.खा. राजू शेट्टी, व चित्रलेखाचे संपादक, अभिनेते दिग्दर्शक ज्ञानेश महाराज यांच्या हस्ते पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिर येथे प्रदान करण्यात आला.


राहुल कुमार चव्हाण हे कोर्टी येथील रहिवाशी असून सध्या न्यू इंग्लिश स्कूल अँड जुनिअर कॉलेज खामगाव मावळ येथे कार्यरत आहेत.
इतिहास संशोधक व मार्गदर्शक डॉक्टर श्रीमंत कोकाटे, राष्ट्रसेवा समूहाचे संस्थापक अध्यक्ष राहुल भाऊ पोकळे

 तसेच विविध सामाजिक संघटना यांच्या माध्यमातून महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या नावानेच शिक्षक दिन साजरा झाला पाहिजे,यासाठी सातत्याने गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून प्रबोधन चालू आहे, त्याचा एक भाग म्हणून आज बालगंधर्व या ठिकाणी अत्यंत देखणा सोहळा दिमाखात पार पडला.

या प्रसंगी पी ए इनामदार,दिगंबर दुर्गाडे श्रीकांत शिरोळे, इतिहास संशोधक व महात्मा फुले साहित्य अकादमीचे अध्यक्ष डॉ. श्रीमंत कोकाटे सचिव राहुलभाऊ पोकळे, प्रा.सोमनाथ गोडसे प्रा.औदुंबर लोंढे, संजय गवळी आदी मान्यवर उपस्थित होते.

माझा हा सन्मान श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळचे अध्यक्ष, उपाध्यक्ष,सचिव, व सर्व पदाधिकारी तसेच माझे सर्व मार्गदर्शक सहकारी शिक्षक शिक्षकेतर स्टाफ, माझे आई बाबा व कुटुंबीय आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यांच्यामुळे हा प्राप्त झाला.

ते सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्यामुळे आहे. आणि तो विश्वास सार्थ ठरण्याचा माझा नेहमीच प्रयत्न राहील असे याप्रसंगी राहुल कुमार चव्हाण यांनी सांगितले.

litsbros

Comment here