करमाळाक्राइम

कोर्टी-आवाटी रस्त्यासाठी क्वालिटी कंट्रोल कार्यालय तितकेच दोषी; एन.पी.कंट्रक्शन विरोधात बार्शी कार्यालयासमोर आंदोलन

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

कोर्टी-आवाटी रस्त्यासाठी क्वालिटी कंट्रोल कार्यालय तितकेच दोषी; एन.पी.कंट्रक्शन विरोधात बार्शी कार्यालयासमोर आंदोलन


करमाळा (प्रतिनिधी); करमाळा तालुक्यातील कोर्टी-आवाटी या रस्त्याचे काम एन.पी. कन्स्ट्रक्शन या कंपनीने घेतले आहे. मात्र या रस्त्याचे काम अत्यंत खराब झाले आहे. त्यामुळे याला शासनाचे बांधकाम विभागाचे अधिकारी दोषी आहेतच शिवाय शासनाने यांच्यावर देखरेख करण्यासाठी आणि कामाची क्वालिटी चांगली व्हावी म्हणून क्वालिटी कंट्रोलची स्थापना केली.

कामाची गुणवत्ता तपासणे करणे हे प्रामुख्याने त्यांचे काम आहे. परंतु, कंपनीचे अधिकारी कॉन्ट्रॅक्टर बरोबर आर्थीक देवाण-घेवाण झाली असल्याने रस्त्याचे काम गुणवत्तापुर्वक झाले नाही. त्या निषेधार्थ बार्शीच्या क्वालिटी कंट्रोल कार्यालयासमोर दि. १२ ऑक्टोबर रोजी शेकडो शेतकऱ्यांसह आंदोलन करण्याचा इशारा जनशक्ती संघटनेने दिला आहे.

या निवेदनात पुढे म्हटले आहे की, आपल्या कंपनीवर विश्वास ठेऊन शासनाने रस्त्याची गुणवत्ता तपासणी करण्याचे काम आपल्याकडे दिलेले आहे.

परंतु, करमाळा तालुक्यात चालु असलेल्या कोर्टी-आवाटी रस्त्याच्या गुणवत्तेबाबत सर्व-सामान्य लोकांनी जाब कोणाला विचारायचा, आपल्या बार्शीच्या कार्यालयामध्ये वेळोवेळी भेट देऊन आपणास विचारणा केली असता, आपल्याकडुन प्रतिसाद मिळत नाही. उलट एन.पी. कंपनीला पाठीशी घालुन रस्त्याला काळी माती भरणे, शेजारच्या शेतकऱ्यांना पिकाला त्रास होईल अशा पध्दतीचे वागणुक करणे, अंदाजपत्रकाप्रमाणे काम न करणे, अशा अनेक तक्रारी आम्ही केल्या.

परंतु, कॉन्ट्रॅक्टरला पाठीशी घालुन १४० कोटी कामापैकी निम्मे बिल आपण दिलेल्या गुणवत्तेच्या तपशिलामुळे त्या कॉन्ट्रॅक्टरने काढुन घेतलेले आहे. तरी, जेवढा कॉन्ट्रॅक्टर दोषी असेल तेवढेच शासनाने नेमलेले आपल्या कंपनी LEA Associates South Asia Pvt. Ltd, Barshi या कंपनीतील अधिकारी हे दोषी आहेत. म्हणून सदर अधिकाऱ्यावर कारवाई होऊन त्या ठिकाणी नवीन अधिकारी नेमावेत आणि केलेल्या कामाची गुणवत्ता परत एकदा तपासण्यात यावी.

पुढील काम गुणवत्तापुर्ण व्हावे अशी मागणी करत जनशक्ती चे संस्थापक अतुल खूपसे-पाटील यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

litsbros

Comment here